पैठणच्या मातीतून थेट 'कोण बनेगा करोडपती'च्या मंचावर, शेतकरी कैलास कुटेवाड यांनी जिंकले 50 लाख रुपये!

Last Updated:

पैठण तालुक्यातील एका छोट्याशा गावात शेती-मजुरी करत आयुष्य जगणाऱ्या कैलास रामभाऊ कुटेवाड यांनी ‘कोण बनेगा करोडपती’ या लोकप्रिय ज्ञानाधिष्ठित कार्यक्रमात अपूर्व यश संपादन करत आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तब्बल 50 लाख रुपये जिंकले आहेत.

+
‎पैठणच्या

‎पैठणच्या मातीतून थेट 'कोण बनेगा करोडपती'च्या मंचावर; अल्पभूधारक शेतकरी कैलास कु

‎छत्रपती संभाजीनगर: पैठण तालुक्यातील एका छोट्याशा गावात शेती-मजुरी करत आयुष्य जगणाऱ्या कैलास रामभाऊ कुटेवाड यांनी ‘कोण बनेगा करोडपती’ (केबीसी) या लोकप्रिय ज्ञानाधिष्ठित कार्यक्रमात अपूर्व यश संपादन करत आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तब्बल 50 लाख रुपये जिंकले आहेत.
‎‎कुटेवाड हे एक अल्पभूधारक शेतकरी असून, त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. कुटुंबाच्या उपजीविकेसाठी ते मजुरीही करत होते. मात्र, शिक्षणाची आवड, जिद्द आणि सामान्यज्ञानाची सातत्याने केलेली तयारी याच्या जोरावर त्यांनी केबीसीच्या मंचावर आपले स्थान पक्के केले आणि देशभरातील लाखो प्रेक्षकांचे मन जिंकले. कैलास यांनी शोदरम्यान अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नांना आत्मविश्वासाने उत्तरे देत एकामागोमाग एक पातळी पार करत 50 लाख रुपयांपर्यंतचा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण पैठण तालुका आणि संभाजीनगर जिल्हा अभिमानित झाला आहे.
advertisement
‎‎मला हे 50 लाख रुपये मिळालेत याचा उपयोग मी माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी करणार आहे मला क्रिकेटर व्हायचं होतं पण घरची परिस्थिती नसल्यामुळे मला ते होता नाही आलं तर मी माझ्या मुलांना क्रिकेटसाठी देखील शिक्षण देणार आहे आणि छोटासा व्यवसाय सुरू करावा अशी माझी इच्छा आहे तर या करता ही रक्कम नीट वापरणार आहे असं कैलाश यांनी सांगितलं आहे.
advertisement
‎‎त्यांची पत्नी म्हणून मला खूप अभिमान आहे त्यांनी जे यश मिळवलाय त्यामुळे आमची परिस्थिती आज सुधारणार आहे आणि आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी या पैशांचा आम्ही उपयोग करणार आहोत आणि मला आज खूप आनंद होत आहे असं कैलास यांच्या पत्नींने सांगितलाय. ‎‎कैलास कुटेवाड यांचं हे यश हे ग्रामीण भागातील युवकांसाठी प्रेरणास्थान ठरत असून, प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, चिकाटी आणि मेहनत याच्या जोरावर काय साध्य करता येते, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.
advertisement
मोलमजुरी करणाऱ्या कैलास नावाच्या पठ्ठ्यानं केबीसीचं मैदान मारलं
‎‎लहानपणी शिक्षणाचे स्वप्न अपूर्ण राहिलेल्या व आता मोलमजुरी करून उपजीविका भागवणाऱ्या पट्ट्याने केबीसीचा मैदान मारलं. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरी मजूर कैलास रामभाऊ कुटेवाड असं केबीसी मध्ये 1 ते 14 प्रश्नांची अचूक उत्तर देऊन 50 लाख रुपये जिंकलेल्या तरुणाचं नाव आहे. कैलास हे पैठण तालुक्यातील बालानगर जवळ असलेल्या एका 600 जणांच्या वस्तीत राहतात. त्यांना दोन एकर कोरडवाहू शेती असून त्यावर आई-वडील पती पत्नी दोन मुले यांचा उदरनिर्वाह चालतो. यावर नाहीच वागलं तर कैलास हे मूलमजुरी करतात. लहानपणी शाळेत हुशार असताना देखील योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने त्यांना पुढील शिक्षण घेता आलं नाही यामुळे त्यांच्या मनात याबाबत खंत होती. मात्र त्यांनी काहीतरी करण्याची इच्छा सोडली नाही. गेल्या पाच वर्षापासून ते केबीसी मध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत अखेर सहाव्यांदा त्यांच्या प्रयत्नांना यश आला असून त्यांनी सहभागी होत 50 लाख रुपये जिंकले आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/औरंगाबाद/
पैठणच्या मातीतून थेट 'कोण बनेगा करोडपती'च्या मंचावर, शेतकरी कैलास कुटेवाड यांनी जिंकले 50 लाख रुपये!
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement