तीन लाख आण नाहीतर..., पैशांसाठी पत्नीसोबत असं केलं, सगळं गाव हळहळलं

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar Crime : वाळूज येथे एका विवाहित महिलेला हुंड्यासाठी छळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सासरच्या मंडळींनी तीन लाख रुपयांची मागणी करत धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हुंड्यासाठी छळाचे वाढते प्रकार; तीन लाखांसाठी विवाहितेला धमक्या, वाळूजमध्ये गुन्
हुंड्यासाठी छळाचे वाढते प्रकार; तीन लाखांसाठी विवाहितेला धमक्या, वाळूजमध्ये गुन्
‎छत्रपती संभाजीनगर : सध्या लग्नानंतर पैशाची मागणी, हुंड्यासाठी होणारा छळ आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. माहेरहून पैसे आणण्यासाठी दबाव, किरकोळ कारणावरून मानसिक त्रास आणि जीवघेण्या धमक्या अशा घटना अनेक घरांमध्ये उघडकीस येत असून वाळूजमधील आणखी एक गंभीर प्रकरण समोर आले आहे.
‎वाळूज परिसरातील 36 वर्षीय गायत्री यांनी सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या छळाविरोधात वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पतीसह सासरच्या अन्य सदस्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
‎गायत्री यांचा विवाह 43 वर्षीय दीपक हरिचंद्रे रा एल-175, म्हाडा कॉलनी, तिसगांव, छत्रपती संभाजीनगर यांच्यासोबत झाला असून त्यांना दोन मुली आहेत. लग्नाच्या सुरुवातीचे काही महिने व्यवस्थित गेल्यानंतर सासरच्यांकडून त्रास सुरू झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पती दीपक हा व्यवसायासाठी माहेरहून 3 लाख रुपये घेऊन ये, अशी वारंवार मागणी करत शिवीगाळ आणि अपमान करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
advertisement
‎घरकामावरून टोमणे, ‘तू आमच्या लायकीची नाही’ असे अपमानास्पद बोल तसेच मानसिक आणि शारीरिक छळ सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. एवढ्यावरच न थांबता, नणंद संगिता केरे आणि तिचे पती बाळासाहेब केरे यांनी पतीला दुसरे लग्न करण्यासाठी चिथावणी दिली आणि “हिला घराबाहेर काढ, मी तुझ्यासाठी दुसरी मुलगी बघते” असे सांगितल्याचाही आरोप आहे.
advertisement
‎सगळ्यात धक्कादायक म्हणजे, “तुला आणि तुझ्या मुलींना संपवून टाकू” अशी गंभीर स्वरूपाची धमकी नणंदीकडून देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या सर्व प्रकरणाच्या आधारे वाळूज एमआयडीसी पोलिसांनी पती, सासू-सासरे, नणंद आणि इतर नातेवाईकांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली असून पुढील तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/औरंगाबाद/
तीन लाख आण नाहीतर..., पैशांसाठी पत्नीसोबत असं केलं, सगळं गाव हळहळलं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement