live in Relationship : लिव्ह-इनमध्ये तिने स्वप्न रंगवलं, पण त्याने साथ सोडली, कोर्टानं शिकवला धडा, वाचा नेमकं प्रकरण काय?

Last Updated:

Supreme Court Ruling on live-in Relationship Rights : सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेस पोटगीसह काही आर्थिक आणि सामाजिक अधिकार मिळतील

News18
News18
छत्रपती संभाजीनगर : साथ होती, प्रेम होतं... पण जबाबदारीचं काय? एकत्र राहात असताना स्वप्नं रंगवली गेली, आयुष्याची वाटचाल हातात हात घालून सुरू झाली. मात्र, नातं तुटलं, आणि ती एकटीच उरली. एका लहानग्याची आई होऊन विवाहाची कायदेशीर चौकट नसली, तरी भावना खऱ्या होत्या. तिच्या संघर्षाला आणि न्यायासाठीच्या लढ्याला अखेर न्यायालयाची साथ मिळाली.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निर्णयात लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेच्या हक्कांना मान्यता देत दरमहा 55,000 रुपयांची आर्थिक मदत आणि 2 लाख नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला आहे. हा निर्णय अनेक अशा महिलांसाठी आशेचा किरण ठरणार आहे, ज्या नात्यांच्या नावाखाली अन्याय सहन करत आहेत.
‎सातारा परिसरात 2008 साली राहणाऱ्या हुजूर पटेल नावाच्या व्यक्तीशी संबंधित महिलेची ओळख झाली. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले आणि ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. काही वर्षांनी त्यांना एक मुलगा झाला. मात्र नंतर पटेल यांनी महिलेकडे दुर्लक्ष करणे सुरू केले.
advertisement
‎त्यामुळे महिलेने 'कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, 2005' अंतर्गत मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. सुरुवातीला न्यायालयाने महिलेस आणि मुलास प्रत्येकी 5000 पोटगी मंजूर केली होती. परंतु ती रक्कम तुटपुंजी असल्याचे म्हणत महिलेने अपील केले. दुसरीकडे हुजूर पटेल यांनीही त्या निर्णयाविरोधात अपील केले.
‎शेवटी छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एम.एस. अग्रवाल यांनी 15 सप्टेंबर रोजी दिलेल्या निर्णयात महिलेस 10000, मुलाला 5000, शिक्षणासाठी 20000 आणि घरभाड्यासाठी 20000 असा एकूण 55 हजार प्रतिमहिना खर्च आणि 2 लाख नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला. या प्रकरणात पीडित महिलेची बाजू अ‍ॅड. योगेश सोमाणी आणि अ‍ॅड. के. जी. बगनावत यांनी यशस्वीपणे मांडली.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/औरंगाबाद/
live in Relationship : लिव्ह-इनमध्ये तिने स्वप्न रंगवलं, पण त्याने साथ सोडली, कोर्टानं शिकवला धडा, वाचा नेमकं प्रकरण काय?
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement