Sambhajinagar Crime : 'तुझ्या वडिलांना ठार मारीन' अशी धमकी देत आरोपीने केले अमानुष कृत्य; संभाजीनगर शहरात खळबळ
- Published by:Tanvi
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
वडिलांचा बळी घेईन' धमकी देऊन अल्पवयीन कॉलेज विद्यार्थिनीवर लॉजमध्ये बलात्कार; 25 वर्षीय आरोपीवर पोक्सोसह गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील फर्दापूर भागात एका महाविद्यालयीन अल्पवयीन मुलीला धमकी देऊन लॉजमध्ये नेले आणि तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने 'तुझ्या वडिलांना जीव घेईन' अशी जीवघेणी धमकी देऊन मुलीला सकाळी आठच्या सुमारास जबरदस्तीने कारमध्ये बसवले आणि हे कृत्य केले. घटना 1 नोव्हेंबर रोजी घडली, तर दुसऱ्या दिवशी रविवारी अजिंठा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल झाली.
आरोपीचे नाव कृष्णा माणिकराव काळे, वय 25, राहणार शिवना, असे आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, कृष्णाने कॉलेज कॅम्पसमध्येच मुलीला थांबवले आणि गप्पा मारताना कारमध्ये बसण्यास भाग पाडले. मुलीने विरोध केल्यावर धमकी देऊन तिला फर्दापूरला नेले. लॉजमध्ये पोहोचल्यावर पुन्हा भीती घालून तिच्यावर अत्याचार केला. मुलीने कितीही विरोध केला तरी दहशतीमुळे ती काहीच करू शकली नाही.
advertisement
महाविद्यालय सुटल्यावर संध्याकाळी घरी पोहोचताच मुलीने आई-वडिलांना सर्व प्रकार सांगितला. पालकांनी लगेच पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी पोक्सो कायद्याच्या तरतुदींसह बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद करून आरोपीचा शोध आणि तपास सुरू केला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 03, 2025 9:54 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/औरंगाबाद/
Sambhajinagar Crime : 'तुझ्या वडिलांना ठार मारीन' अशी धमकी देत आरोपीने केले अमानुष कृत्य; संभाजीनगर शहरात खळबळ


