दिल्लीतून ट्रेनिंग, लाखोंचा सेट अप, रो-हाऊसमध्ये ऑनलाइन गॅम्बलिंगचा अड्डा पाहून पोलिसही चक्रावले, छ.संभाजीनगरमध्ये खळबळ

Last Updated:

‎दिल्लीत ट्रेनिंग घेऊन कुंभेफळच्या ड्रीम सिटी सोसायटीतील एका रो-हाऊसमध्ये फक्त 13 दिवसांत गोरखधंदा रंगला आणि तितक्याच वेगाने पोलिसांनी तो उध्वस्तही केला.

‎दिल्लीत ट्रेनिंग घेऊन कुंभेफळला उभारला ऑनलाइन गॅम्बलिंगचा अड्डा; पोलिसांच्या छा
‎दिल्लीत ट्रेनिंग घेऊन कुंभेफळला उभारला ऑनलाइन गॅम्बलिंगचा अड्डा; पोलिसांच्या छा
छत्रपती संभाजीनगर: कुंभेफळच्या ड्रीम सिटी सोसायटीतील एका रो-हाऊसमध्ये फक्त 13 दिवसांत गोरखधंदा रंगला आणि तितक्याच वेगाने पोलिसांनी तो उध्वस्तही केला. सिडकोतील 26 वर्षीय सूरज पचलोरे हा दिल्लीला जाऊन ऑनलाइन गॅम्बलिंगचे प्रशिक्षण घेऊन आला. त्यानंतर परराज्यातील काही तरुणांना सोबत घेत ड्रीम सिटी येथील रो- हाऊस क्रमांक 14 मध्ये मोठा सेटअप उभा करून जुगाराचा व्यवसाय सुरू केला.
मात्र ग्रामीण पोलिसांच्या मदतीने, स्थानिक गुन्हे शाखा आणि करमाड पोलिसांनी बुधवारी (29 नोव्हेंबर) रात्री धडाकेबाज कारवाई करत हा अड्डा उद्ध्वस्त केला. एकूण 9 आरोपींना अटक करण्यात आली असून 8 लाख 27 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली. सूरज पचलोरे (सिडको), प्रणव मानकर, महेंद्र नवग्रह, प्रतीक मोरे (औरंगाबाद शहर), तर राहुल डनसेना, सूरजकुमार यादव, रोहन विशमकुमार, शहादाब खान (छत्तीसगड), सौरभ महाले (जुना मोंढा) अशी या रॅकेटमधील नावे आहेत.
advertisement
सर्वच आरोपींना स्थानिक पोलिसांनी, गुन्हे शाखेने आणि करमाड पोलिसांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ॲडव्हान्स सेटअप उभारत 40 खेळांवर ऑनलाइन जुगार खेळला जात होता. केंद्र सरकारने नुकतीच 1500 हून अधिक जुगाराच्या साइट्सवर बंदी घातली असली, तरी हे रॅकेट ‘साऊथ बुक’सह इतर विदेशी वेबसाईटवरून धडाक्यात चालू होते. क्रिकेट, फुटबॉल, टेनिसपासून ते बेसबॉलवरही बेटिंग घेतले जात होते. पोलिसांनी या ठिकाणावरून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. या ठिकाणी फक्त भारतातच नाही तर परदेशी नागरिकही आपले पैसे गुंतवत होते. या प्रकरणाची पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे.
advertisement
या ठिकाणी काय सापडले?
‎5 लॅपटॉप, 1 टॅब, 22 मोबाइल, 6 सिमकार्ड, 22 एटीएम कार्ड, 4 क्यूआर कोड स्कॅनर सापडेल आहेत. दिवसाला 3 ते 4 लाखांची उलाढाल केली जात होती आणि ग्राहक भारताबाहेरूनही संपर्क साधत होते.  ‎हे तरुण सतर्क असल्याने मुख्य दरवाजातून पोलिस आत गेले तर धंदा उडण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी शेजारच्या रो-हाऊसच्या छतावरून दुसऱ्या घरी जाणारा दरवाजा तोडला आणि आत शिरताच 9 जण प्रत्यक्ष काम करताना पकडले. रो-हाऊसचा मालक आरोपी सॉफ्टवेअर कंपनीत काम करतो, वर्क फ्रॉम होम आहे असा बहाणा करून त्याने हे घर घेतले होते. जप्त केलेल्या मोबाईलमधून ते दुबईपर्यंतच्या सूत्रधारांशी संपर्कात असल्याचेही उघड झाले.
advertisement
या रॅकेटमध्ये सहभागी अनेक तरुण उच्चशिक्षित आहेत-
  • ‎पचलोरे – बीपीएड पदवीधर, पोलिस कर्मचाऱ्याचा नातेवाईक
  • मानकर – मेकॅनिकल इंजिनिअर
  • नवग्रह – बीएस्सी फिजिक्स विद्यार्थी
  • महाले – छायाचित्रकार‎‎
सर्व जण टक्केवारीवर काम करीत होते, तर झारखंडमधून आणलेल्या काही मुलांना २०–३० हजार रुपये पगार मिळत होता. शहादाब खान हा विदेशातील मोठ्या सूत्रधारांशी थेट संपर्कात असल्याचे पोलिस तपासात पुढे आले. निरीक्षक विजयसिंह राजपूत, संग्रामसिंग राजपूत, एपीआय संतोष मिसळे, पवन इंगळे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे मोठे पथक या कारवाईत सहभागी होते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/औरंगाबाद/
दिल्लीतून ट्रेनिंग, लाखोंचा सेट अप, रो-हाऊसमध्ये ऑनलाइन गॅम्बलिंगचा अड्डा पाहून पोलिसही चक्रावले, छ.संभाजीनगरमध्ये खळबळ
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement