Chhatrapati Sambhajinagar : नकली ठेवलं अन् असली पळवलं, महिलेनं कर्मचारी अन् CCTVलाही गंडवल, 14 दिवसानंतर...

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगरमधील ज्वेलर्समध्ये महिलेने खोट्या अंगठ्यांचा उपयोग करून 22 कॅरेटच्या दोन सोन्याच्या अंगठ्या चोरी केल्या. 14 दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी आरोपीला पकडले आहे.

News18
News18
छत्रपती संभाजीनगर :  एक अशी चोरी जी ऐकूनच थक्क झाले आहे,जी घटना छत्रपती संभाजीनगरमधील आकाशवाणी येथील एका ज्वेलर्समध्ये उघडकीस आली आहे. खरेदीच्या बहाण्याने अंगठ्यांची चाचपणी करत असताना एका महिलेने दोन खोट्या अंगठ्या ट्रे मध्ये ठेवून त्यातील खऱ्या 22 कॅरेटच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्या. या चोरीची माहिती ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्यांना ध्यानात आल्यावर 11 नोव्हेंबर रोजी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
नेमके घडले काय?
मिळालेल्या माहितीनुसार, दि. 10 नोव्हेंबर रोजी दुकानात असलेल्या दागिन्यांची नेहमी प्रमाणे तपासणी होत होती. दरम्यान हे काम सुरु असताना एका ट्रेतील दोन अंगठ्या खोट्या असल्याचे लक्षात आले. मग काय तात्काल त्यांनी मागील काही दिवसांत सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. हे सीसीटीव्ही पाहत असताना त्यांना दिसून आले की, 28 ऑक्टोबर रोजी दुपारी ग्राहक म्हणून आलेल्या महिलेने अंगठ्या दाखविण्याची मागणी केली होती.
advertisement
महिला कर्मचारी इतर ट्रे काढण्यासाठी बाजूला गेल्यावर तिने आपल्या हातातील दोन खोट्या अंगठ्या ट्रे मध्ये ठेवल्या आणि त्यातील खऱ्या 22 कॅरेटच्या सोन्याच्या अंगठ्या त्यांच्याकडे लपवल्या मग वस्तू न घेता तेथून त्यांनी पळ काढला.
पोलिसांनी 14 दिवसांच्या तपासानंतर आरोपींना ताब्यात घेतले. या घटनेमुळे नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे, विशेषतः ज्वेलरी खरेदी करताना. पोलिसांनी नागरिकांना फसवणूक आणि चोरीसंबंधी तातडीने तक्रार करण्यास सांगितले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/औरंगाबाद/
Chhatrapati Sambhajinagar : नकली ठेवलं अन् असली पळवलं, महिलेनं कर्मचारी अन् CCTVलाही गंडवल, 14 दिवसानंतर...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement