Beed News : राम मंदिर उडवण्याच्या कटात सहभागी होण्याची ऑफर, बीडच्या तरुणाला थेट पाकिस्तानातून मेसेज,नेमकं प्रकरण काय?

Last Updated:

लाखो करोडो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिर उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. पाकिस्तानाहून ही धमकी आल्याची माहिती आहे.

ayodhya ram mandir
ayodhya ram mandir
Ayodhya Ram Mandir Blast Threat : सुरेश जाधव, बीड : लाखो करोडो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिर उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. पाकिस्तानाहून ही धमकी आल्याची माहिती आहे.या धमकीत संशयिताने आपलं कराचीतलं लोकेशनही पाठवलं आहे.तसेच हे काम करणाऱ्याला 1 लाख रूपये आणि संबंधित मंदिर उडवण्यासाठी दारूगोळा देण्याचे सांगितले. बीडमधील एका तरूणाला ही धमकी आली आहे. या धमकीने एकच खळबळ माजली आहे.
बीड जिल्ह्यातील शिरूर कासारच्या तरुणाला इंस्टाग्राम या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर धमकीचा मेसेज आला आहे. या मेसेजमध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.विशेष म्हणजे, धमकीखोराने आपण पाकिस्तानी आहोत हे पटवून देण्यासाठी आपले कराचीमधील लोकेशनही शिरूरच्या तरुणाला पाठवले आहे. शिवाय, या कटात सहभागी होण्यासाठी 1 लाख रुपयांची ऑफर दिली. या कामासाठी 50 जण हवे असून त्यांना प्रत्येकी 1 लाख देऊ, मंदिर उडवण्यासाठी आरडीएक्स पुरवू, असे संशयिताने मेसेजद्वारे सांगितले.याप्रकरणी शिरुर पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
advertisement

धमकीचा मेसेजमध्ये काय?

पाकिस्तानी संशयिताने इंस्टाग्रामवर एक ऑडीओ क्लिप शेअर केली आहे. या ऑडिओमध्ये पाकिस्तानी युजर म्हणतो, 'सोचके बताओ, हमारा साथ दो, मुंह खोल तुझे कितना अमाउंट चाहिये. हमें अयोध्या का मंदिर आरडीएक्ससे उड़ाना हैं. 50 बंदे चाहिये, आरडीएक्स पोहोच जायेगा.1 लाख रूपया मिल जाएगा, अगर तुम नही कर सकते तो किसी और को नबंर देदो, असा संवाद ऑडिओक्लिपमध्ये आहे.
advertisement
याप्रकरणी शिरुर पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच
संशयित युजर खरोखर पाकिस्तानचा आहे का हे तपासानंतर स्पष्ट होईल. इंस्टाग्राम वरून हे संदेश पाठवण्यात आले आहेत त्याचा तपास सुरू आहे नेमका हा संदेश कोणी पाठवला या संदर्भातही पोलीस तपासून सत्य समोर येईल असं सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव यांनी सांगितलं. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed News : राम मंदिर उडवण्याच्या कटात सहभागी होण्याची ऑफर, बीडच्या तरुणाला थेट पाकिस्तानातून मेसेज,नेमकं प्रकरण काय?
Next Article
advertisement
Silver Price News: चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

View All
advertisement