राजकारणी अन् बिल्डर लॉबीकडून बाबा सिद्दीकीची हत्या? प्रकरणात नवा ट्विस्ट, पत्नीचे गंभीर आरोप

Last Updated:

बाबा सिद्दीकी यांची हत्येमागे राजकीय नेते आणि बिल्डर लॉबी असल्याचे धक्कादायक आरोप बाबा सिद्दीकी यांच्या पत्नी शेहझीन सिद्दीकी यांनी केली आहे.

News18
News18
मागील वर्षी माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईतील वांद्रे परिसरात निर्घृण हत्या करण्यात आली होती. ते आपला मुलगा झिशान सिद्दीकी यांच्या ऑफिसबाहेर उभे असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना अटकही केली होती. या हत्येची जबाबदारी कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली होती. सलमान खानसोबत जवळीक असल्याच्या कारणातून ही हत्या झाल्याचं बिश्नोई गँगचं म्हणणं होतं.
आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्येमागे राजकीय नेते आणि बिल्डर लॉबी असल्याचे धक्कादायक आरोप बाबा सिद्दीकी यांच्या पत्नी शेहझीन सिद्दीकी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पोलिसांनी तपास अर्ध्यावर सोडला. या हत्येमागचे खरे गुन्हेगार शोधण्यात पोलिसांना अपयश आल्याचं शेहझीन सिद्दीकी यांनी याचिकेत म्हटलं आहे.
advertisement
ज्यावेळी बाबा सिद्दीकींची हत्या झाली? तेव्हा त्यांच्या हत्येमागे एका एसआरए प्रकल्पाचं कारण असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र त्यानंतर बिश्नोई गँगने हत्येची जबाबदारी घेतल्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं होतं. आता पुन्हा एकदा बाबा सिद्दीकींच्या पत्नीने सिद्दीकींच्या हत्येमागे राजकीय नेते आणि बिल्डर लॉबी असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट बघायला मिळत आहे.
advertisement

तपास दिशाभूल करणारा असून अर्ध्यावर सोडण्याचा आरोप

चौकशी दरम्यान दिलेल्या जबाबाकडे कानाडोळा केल्याचा आरोप बाबा सिद्दीकी यांच्या पत्नी शेहझीन सिद्दीकी यांनी केला आहे. हत्येत राजकीय आणि प्रभावशाली व्यक्तींच्या हस्तक्षेपाच्या छटा असून अशा व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप देखील याचिकेत करण्यात आला आहे. तपास दिशाभूल करणारा असून अर्ध्यावर सोडण्याचा देखील याचिकेत आरोप आहे. डोंगर पोखरून उंदीर काढल्याचा याचिकेत म्हटलं आहे. पुढील सुनावणी 11 नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे. 12 ऑक्टोबर 2024ला बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राजकारणी अन् बिल्डर लॉबीकडून बाबा सिद्दीकीची हत्या? प्रकरणात नवा ट्विस्ट, पत्नीचे गंभीर आरोप
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement