काय सांगता! फक्त हात दाखवून दररोज अडीच लाख रुपये कमवते ही महिला
- Published by:Priya Lad
Last Updated:
Woman earn monet jush show her hand : एका नातेवाईकाच्या लग्न आणि साखरपुड्याच्या अंगठीच्या फोटोशूटमध्ये मदत केल्यानंतर तिने तिचे फोटो एका एजंटला पाठवले आणि साइन अप केल्यानंतर एक-दोन आठवड्यात तिला पहिली नोकरी मिळाली.
नवी दिल्ली : हात पाहून भविष्य सांगून पैसे कमवणारे ज्योतिषी तुम्हाला माहिती आहेत. पण हात दाखवूनही पैसे कमवता येतात, असं सांगितलं तर साहजिकच तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण एक महिला जी हात दाखवून पैसे कमवते. थोडेथोडके नव्हे तर दररोज अडीच लाख रुपये. ही महिला कोण आणि फक्त हात दाखवून ती इतके पैसे कसे काय कमवते? हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल.
अवीशा तेवानी असं या महिलेचं नाव आहे. न्यूयॉर्कमध्ये राहणारी 35 वर्षांची अवीशा एक मॉडेल आहे. आधी ती एक फ्रीलांस स्टायलिस्ट होती आणि ते अजूनही करत आहे. एका नातेवाईकाच्या लग्न आणि साखरपुड्याच्या अंगठीच्या फोटोशूटमध्ये मदत केल्यानंतर तिने तिचे फोटो एका एजंटला पाठवले आणि साइन अप केल्यानंतर एक-दोन आठवड्यात तिला पहिली नोकरी मिळाली. 2020 मध्ये तिने हँड मॉडेलिंग क्षेत्रात प्रवेश केला.
advertisement
Tata कंपनीच्या वुमन्स हॉस्टेलच्या बाथरूममध्ये छुपा कॅमेरा, तिथल्याच एका तरुणीने लावला; Shocking कारण
अविशाने सांगितले. ऑगस्ट 2020 मध्ये एजंटसोबत करार केल्यापासून तिची कारकीर्द वेगाने प्रगती करत आहे. ती अनेक एजन्सींसोबत काम करते जी तिचे पाय, कान आणि मान यासारख्या विशिष्ट शरीराच्या अवयवांचे मॉडेलिंग करण्यात विशेषज्ज्ञ आहेत. तिने स्टारबक्स, कोका-कोला, अॅब्सोलट वोडका आणि काइली कॉस्मेटिक्स सारख्या मोठ्या नावांसोबत काम केलं आहे. तिच्या सुंदर हातांनी मोठ्या ब्रँडसाठी मॉडेलिंग करून दररोज 2.5 लाख रुपयांपर्यंत कमवते. तिला तिचा चेहरा दाखवावा लागत नाही.
advertisement
अवीशाने अलीकडेच खुलासा केला की डायर आणि चॅनेल सारख्या उच्च दर्जाच्या ब्रँडसाठी काम करणाऱ्या या प्रोफेशनल हँड मॉडेलचं आयुष्य दिसतं तितकं सोपं नाही. तिला अनेक कठीण आणि आव्हानात्मक परिस्थितींचा सामना करावा लागतो.
ती म्हणते, अनेक लोकांना वाटतं की शूटिंग म्हणजे फक्त गोष्टी धरून ठेवणं असतं, पण बहुतेकदा ते आव्हानात्मक असतं. क्लायंटच्या मागणीनुसार ती लोकेशनला 2 ते 12 तास काम करते आणि क्रूमध्ये 5 ते 35 लोक असू शकतात. कधीकधी सकाळी 7 वाजल्यापासूनच बुकिंग कन्फर्म होतं. ज्यामुळे काम कठीण होतं.
advertisement
ग्राहकांनाही त्यांना नेमकं काय हवं आहे हे माहित नसतं. उत्पादन आकर्षक दिसण्यासाठी, ब्रँडिंग दाखवण्यासाठी आणि तुमचा हात सुंदर दिसावा यासाठी ते तुमच्या सर्जनशीलतेवर अवलंबून असतात."
उदाहरण देत, अविशा स्पष्ट करते, "कधीकधी एखाद्या ब्रँडकडे उत्पादनाचं फक्त एक किंवा दोन नमुने असतात, जसं की लिपस्टिक. तुम्हाला ते हलवावं लागतं, ते लावावं लागतं, त्याच्याशी काहीतरी करावं लागतं. पण फक्त दोनच नमुने असतात, म्हणून तुम्हाला ते योग्यरित्या करावं लागतं याची खात्री करावी लागते."
advertisement
इतकंच नाही तर तिला तिच्या हाताचं सौंदर्य राखण्यासाठी तिच्या आयुष्यात अनेक मोठे बदल करावे लागले. ती सांगते, "मला माझं सिटी बाईक मेंबरशिप सोडावी लागली कारण पूर्वी एका अपघातात माझा कोपर आणि मनगट फ्रॅक्चर झाला होता. मी आता तो धोका पत्करू शकत नाही. मला बॉक्सिंगची आवड होती, पण हातांना इजा होऊ नये म्हणून वर्कआउट करत नाही. भांडी धुताना कधीही ग्लोव्ह्ज घालत नव्हते, पण आता मी ते अनेकदा करते"
view commentsLocation :
Delhi
First Published :
November 08, 2025 7:01 AM IST


