Tata कंपनीच्या वुमन्स हॉस्टेलच्या बाथरूममध्ये छुपा कॅमेरा, तिथल्याच एका तरुणीने लावला; Shocking कारण
- Published by:Priya Lad
Last Updated:
Spy camera in tata women hostel bathroom : टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यांच्या वसतिगृहात एक छुपा कॅमेरा सापडला. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणीला अटक केली आहे.
चेन्नई : कंपन्यांचे ऑफिस, हॉस्टेलमध्ये कॅमेरे असतात. पण एकमेव जागा म्हणजे बाथरूम जिथं कॅमेरे नसतात. पण देशातील बड्या कंपन्यांपैकी एक असलेली टाटा कंपनी. या कंपनीच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये छुपा कॅमेरा लावल्याने एकच खळबळ उडाली आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यांच्या वसतिगृहात एक छुपा कॅमेरा सापडला. तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना आहे.
advertisement
तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यांच्या वसतिगृहात एक छुपा कॅमेरा सापडला. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
होसूर येथील नागमंगलम येथील टाटा इलेक्ट्रॉनिक्सचं केलामंगलम येथील विडियाल रेसिडेन्सी हे गर्ल्स हॉस्टेल. जिथं 11 मजले आणि 8 ब्लॉक आहेत. इथं 6000 हून अधिक महिलांसाठी राहण्याची व्यवस्था आहे. प्रत्येक खोलीत 4 महिला राहत होत्या. इथं राहणाऱ्या महिलांपैकीच एक महिला जिने इथल्या बाथरूममध्ये कॅमेरा लावला. मंगळवारी (4 नोव्हेंबर) हा कॅमेरा महिलांच्या नजरेत पडला आणि त्यांना धक्काच बसला.
advertisement
मीडिया रिपोर्टनुसार एएसपी शंकर म्हणाले की, रविवारी (2 नोव्हेंबर) उत्तरेकडील राज्यांमधील महिलांसाठी असलेल्या खोलीच्या बाथरूममध्ये कॅमेरा बसवण्यात आला होता. मंगळवारी (4 नोव्हेंबर) खोलीतील इतर महिलांना कॅमेरा दिसला आणि त्यांनी वसतिगृह मॅनेजमेंटला याची माहिती दिली.
कॅमेरा सापडल्याने वसतिगृहात तणाव निर्माण झाला. मंगळवारी संध्याकाळी वसतिगृहात राहणाऱ्या 2000 हून अधिक महिलांनी निषेध केला. बुधवारी, अनेक महिला कर्मचाऱ्यांचे पालक वसतिगृहाबाहेर जमले. पोलिसांनी महिला आणि त्यांच्या पालकांना शांत केले. वसतिगृहात राहणाऱ्या 200 हून अधिक महिलांनी त्यांचं सामान घेऊन त्यांच्या गावी परतण्याचा निर्णय घेतला.
advertisement
तपासात हा कॅमेरा दुसरा तिसरा कुणी नाही तर त्याच हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या एका महिलेने लावल्याचं समोर आलं. पोलिस अधीक्षक (एसपी) थांगादुराई यांनी सांगितलं की, आरोपींमध्ये ओडिशा येथील नीलू कुमारी गुप्ता (22 वर्षे) यांचा समावेश आहे, जी कंपनीच्या नागमंगलम येथील कंपनीची कर्मचारी होती.
advertisement
आता एक महिला जी स्वतः तिथं राहते तिनेच बाथरूममध्ये कॅमेरा लावल्याने तुम्हालाही आश्चर्य वाटलं असे. तिने तिचा 25 वर्षांचा बॉयफ्रेंड संतोषच्या सांगण्यावरून हे केल्याचं सांगितलं. तो तिला कॅमेरा बसवण्यासाठी ब्लॅकमेल करत असल्याचं ती म्हणाली. तिने कॅमेरा एका आठवड्यासाठी तिच्याकडे ठेवला होता, तो बसवण्यास तयार नव्हती. पण रविवारी तिने तो बसवला. पण कोणताही व्हिडिओ पाठवला गेला नाही.
advertisement
पोलिसांनी सांगितलं की, नीलू कुमारीचा प्रियकर संतोषलाही अटक केली. उडनपल्ली येथील रहिवासी संतोषला बेंगळुरूमध्ये अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या कॅमेरा फुटेजची तपासणी करत आहेत. महिला पोलीस अधिकाऱ्यांसह दहा पोलीस पथकं प्रत्येक खोलीत इतर कोणतेही छुपे कॅमेरे आहेत का हे तपासत आहेत.
Location :
Tamil Nadu
First Published :
November 06, 2025 11:34 AM IST
मराठी बातम्या/Viral/
Tata कंपनीच्या वुमन्स हॉस्टेलच्या बाथरूममध्ये छुपा कॅमेरा, तिथल्याच एका तरुणीने लावला; Shocking कारण


