मागून हात घातला आणि Kiss! भररस्त्यात दिवसाढवळ्या महिला राष्ट्रपतीसोबतच अश्लील कृत्य; VIDEO VIRAL
- Published by:Priya Lad
Last Updated:
Man Kiss Mexican President : रस्त्यावर नागरिकांनी त्यांना भेटण्यासाठी गर्दी केली. तेव्हाच एका व्यक्तीने संधी साधली. शेनबॉम वाटेत हँडशेक करत होत्या आणि फोटो काढत होत्या. मागून एक पुरुष त्यांच्याकडे आला.
मेक्सिको : राष्ट्रपतीसोबत भररस्त्यात दिवसाढवळ्या अश्लील कृत्य केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली आहे. मेक्सिकोतील ही धक्कादायक घटना आहे. मेक्सिकन राष्ट्रपती क्लॉडिया शेनबॉम यांना एका व्यक्तीने मागून पकडलं आणि किस करण्याचा प्रयत्न केला. हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
क्लॉडिया शेनबॉम यांनी गेल्या वर्षी मेक्सिकोच्या राष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारली. विशेषतः शेनबॉम सार्वजनिक ठिकाणी नागरिकांशी उघडपणे संवाद साधण्यासाठी ओळखल्या जातात. बुधवारी त्या मेक्सिको सिटीमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. तेव्हा असंच लोकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधत होत्या. लोकांसोबत हँडशेक करत होत्या, फोटो काढत होत्या.
रस्त्यावर नागरिकांनी त्यांना भेटण्यासाठी गर्दी केली. तेव्हाच एका व्यक्तीने संधी साधली. शेनबॉम वाटेत हँडशेक करत होत्या आणि फोटो काढत होत्या. मागून एक पुरुष त्यांच्याकडे आला.
advertisement
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता त्या व्यक्तीने सुरुवातीला क्लॉडिया यांच्या खांद्यावर हात ठेवला त्यानंतर मागून दोन्ही हात त्यांच्या हाताच्या घालून घालत त्यांना मागे खेचलं. त्यांना नको त्या ठिकाणी स्पर्श करण्याचा आणि किस करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत कोणताही सुरक्षा कर्मचारी तिथं नव्हता. तो किस करणार तोच एक सुरक्षा कर्मचारी आला आणि त्याने त्या व्यक्तीला क्लॉडिया यांच्यापासून दूर केलं. या घटनेनंतरही महिला राष्ट्रपतींनी आपला संयम राखला. शीनबॉम हळूवारपणे त्या व्यक्तीचे हात बाजूला सारताना दिसल्या. अधिकाऱ्यांच्या मते, तो माणूस दारूच्या नशेत होता.
advertisement
Creep gropes, tries to kiss Mexican President Claudia Sheinbaum https://t.co/JiSNafxXLh pic.twitter.com/T0olnpVlig
— New York Post (@nypost) November 5, 2025
या घटनेमुळे संपूर्ण मेक्सिकोमध्ये संतापाची लाट उसळली आहे आणि सुरक्षा व्यवस्थेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. राष्ट्रपतीच सुरक्षित नाही तर इतर महिलांचं काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वतः राष्ट्रपतींनी यावर भर दिला आहे.
advertisement
त्या म्हणाल्या, तो माणूस पूर्णपणे दारू पिऊन माझ्याकडे आला होता, तो ड्रग्ज घेत होता की नाही हे मला माहित नाही. व्हिडिओ पाहेपर्यंत नेमकं काय घडलं ते मला समजलं नाही. त्याने राष्ट्रपतींसोबत असं केलं तर आपल्या देशातील सर्व महिलांचं काय होईल? मी मेक्सिको सिटीच्या अभियोक्ता कार्यालयात त्या माणसाविरुद्ध तक्रार दाखल केली, जिथं लैंगिक छळ कायद्याने दंडनीय आहे" दरम्यान त्या पुरूषाला अटक करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
view commentsLocation :
Delhi
First Published :
November 06, 2025 10:31 AM IST
मराठी बातम्या/Viral/
मागून हात घातला आणि Kiss! भररस्त्यात दिवसाढवळ्या महिला राष्ट्रपतीसोबतच अश्लील कृत्य; VIDEO VIRAL


