'मुसलमानांचे पूर्वज हिंदू', मुस्लिम तरुणाचा VIDEO VIRAL; सोशल मीडियावर खळबळ
- Published by:Priya Lad
Last Updated:
एका मुस्लिम तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तो दावा करतो की मुस्लिमांचे पूर्वज हिंदू होते. त्याने हा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
नवी दिल्ली : भारतात हिंदू-मुस्लिम हा मुद्दा काही नवीन नाही. यावरून सतत वादविावद होत असतात. कधी कधी एखादे विधान, तर कधी एखादी घटना यामुळे हे सतत चर्चेत येत असतं. आता एका मुस्लिम तरुणाच्या व्हिडीओमुळे पुन्हा याबाबत चर्चा होते आहे. मुस्लिमांचे पूर्वज हिंदू होते, असं विधान या तरुणाने केला आहे. त्याच्या सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच एकच खळबळ उडाली आहे.
झहैक तन्वीर नावाचा हा तरुण. त्याने त्याच्या @zahacktanvir या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्या बायोमध्ये त्याने स्वतःला भारतीय लेखक असं म्हटलं आहे. त्याने हिंदूंना मुस्लिमांचे पूर्वज म्हटलं आहे. आता हे कसं हेसुद्धा या तरुणाने व्हिडीओत सांगितलं आहे. तरुण नेमकं काय काय म्हणाला पाहुयात.
advertisement
व्हिडिओमध्ये तो शांतपणे सांगतो, "भारतात राहणाऱ्या मुस्लिमांना अनेकदा विचारलं जातं की, तुमचे पूर्वज हिंदू होते का? हे सत्य असूनही आम्ही हे मानण्यास नकार देतो. मुस्लिम हिंदूंना मंदिरे दिल्याबद्दल औरंगजेबाची प्रशंसा करतात, परंतु आज जेव्हा मुस्लिम देशात मंदिर बांधली जातात तेव्हा हेच लोक राग व्यक्त करतात.
advertisement
advertisement
पण खरंतर याची लाज वाटण्याची किंवा भीती वाटण्याची गरज नाही. उलट, हे एक सत्य आहे जे आपण स्वीकारलं पाहिजे. मलेशिया, इंडोनेशिया आणि फिलीपिन्स सारख्या देशांमधील मुस्लिम देखील त्यांचे पूर्वज हिंदू असल्याचं मानतात. इतिहासात ज्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला ते सर्व मूळचे हिंदू होते. हजरत अली यांनी सहा वर्षांचे असताना इस्लाम धर्म स्वीकारला, म्हणजेच ते जन्मतः मुस्लिम नव्हते.
advertisement
या तरुणाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर हिंदू समुदाय त्याचं कौतुक करत आहे तर मुस्लिम समुदाय त्याच्यावर नाराजी व्यक्त करत आहे, त्याला धर्मविरोधी मानत आहेत. एका युझरे लिहिलं, "पहिल्यांदाच कोणीतरी सत्य बोलण्याचं धाडस केलं आहे." दुसऱ्याने लिहिलं, "धर्म आणि जात काही फरक पडत नाही; आपण फक्त देशाच्या विकासाबद्दल बोललं पाहिजे." तिसऱ्याने म्हटलं, "जेव्हा एक तर्कसंगत व्यक्ती बोलते." दरम्यान, काहींनी तन्वीरवर टीका करत, हे सर्व हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न अससल्याच म्हटलं आहे.
view commentsLocation :
Delhi
First Published :
November 03, 2025 12:04 PM IST


