अबब! ना डोंगर, ना जंगल, ना पाणी; अशा ठिकाणी तपस्येला बसली व्यक्ती; बडेबडे संन्यासीही पाहून घाबरतील
- Published by:Priya Lad
Last Updated:
Man Meditates On Foot Over Bridge : ही व्यक्ती चक्क ऋषींसारखी तपस्येला बसली आहे. तीसुद्धा कोणता डोंगर, जंगल किंवा पाणी नाही तर अशा ठिकाणी की कुणी स्वप्नातही विचार केला नसेल.
नवी दिल्ली : सामान्यपणे तपस्येला बसायचं म्हटलं की साधू किंवा संन्यासी अशा ठिकाणी जातात जिथं कुणीच नसेल. जेणेकरून त्यांना शांतपणे तपस्या करता येईल, त्यांच्या तपस्येत खंड पडणार नाही. पौराणिक कथांमध्ये पर्वत, जंगल आणि पाण्याच्या आतही ऋषींनी तपस्या केल्याचा उल्लेख आहे. पण आता तपस्येचा असा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहून सगळ्यांना धक्का बसला आहे.
आजच्या समान्यात ऋषींसारखी तपस्या शक्य नाही. पण काही लोक काही मिनिटासाठी ध्यानधारणा करतात. पण घरात, बाल्कनीत, एखादं गार्डन असं ठिकाण असतं. पण ही व्यक्ती चक्क ऋषींसारखी तपस्येला बसली आहे. तीसुद्धा कोणता डोंगर, जंगल किंवा पाणी नाही तर अशा ठिकाणी की कुणी स्वप्नातही विचार केला नसेल.
advertisement
त्यात शहराच्या मध्यभागी असलेल्या फूट ओव्हर ब्रिजच्या छतावर एक माणूस बसून ध्यान करताना दिसत आहे. खाली वाहने धावत आहेत, हॉर्न वाजत आहेत, लोक येत-जात आहेत आणि वर, हा माणूस डोळे मिटून ध्यानात मग्न आहे. इतक्या उंचीवर आणि इतक्या गर्दीतही एखाद्याला शांती मिळू शकते यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.
advertisement
व्हिडीओत तुम्ही पाहाल गाड्यांची वर्दळ पाहता हा एखाद्या शहरातील व्हिडीओ आहे असं दिसतं. सुरुवातीला कॅमेरा रस्त्यावरील गाड्यांकडे असतो. नंतर तो समोर असलेल्या फूटओव्हर ब्रीजकडे जातो. कॅमेरा झुम होतो आणि त्या फूटओव्हर ब्रीजच्या छतावर एक व्यक्ती अर्धनग्न अवस्थेत तपस्या करताना दिसते. व्यक्तीने फक्त कमरेखाली भगव्या रंगाचं कापड घातलं आहे. अगदी ऋषींसारखा तो ध्यान करायला बसला आहे.
advertisement
कदाचित एखाद्या साधू किंवा संन्यासाने ही तपस्या पाहिली तर तोसुद्धा घाबरले. व्हिडीओ पाहून लोक थक्क झाले आहेत. कुणी याला मॉडर्न योगी म्हटलं, कुणी छतगुरू तर कुणी फुटओव्हर ब्रीज बाबा. कुणी कमेंट केली की 'भावाचं ध्यान हाय लेव्हलवर आहे. तर कुणी म्हटलं, 'जेव्हा तुम्हाला ट्रॅफिकचा कंटाळा येतो तेव्हा पुलाच्या छतावर ध्यान करा.'
advertisement
binusinghrajput36 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. काही लोक याला विनोद म्हणून घेत आहेत, तर काही जण ते गांभीर्याने घेत आहेत. आजच्या धावपळीच्या जीवनात, लोक शांती शोधण्यासाठी डोंगरावर किंवा आश्रमात जातात, पण या माणसाने शहराच्या गोंगाटातही शांती मिळवली आहे.
view commentsLocation :
Delhi
First Published :
November 03, 2025 11:36 AM IST
मराठी बातम्या/Viral/
अबब! ना डोंगर, ना जंगल, ना पाणी; अशा ठिकाणी तपस्येला बसली व्यक्ती; बडेबडे संन्यासीही पाहून घाबरतील


