बाबा होण्याचा आनंद! बायकोने दिला जुळ्यांना जन्म, पण बाळांना पाहताच हादरला नवरा, ओक्साबोक्सी रडू लागला

Last Updated:

Baby Viral Video : जुळ्या मुलांचा बाप झाल्याचा आनंद असताना बाळांचा चेहरा पाहिल्यानंतर रडणाऱ्या वडिलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

News18
News18
नवी दिल्ली : बाळाचा जन्म हा जगातील प्रत्येक पालकासाठी सर्वात आनंदाचा क्षण असतो. असंच एक जोडपं जे आईबाबा होणार होते. प्रेग्नंट महिलेला डिलीव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांना एक नाही दोन-दोन बाळं झाली. महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला. पण जसं बाळांना पाहिलं तसा नवऱ्याला धक्काच बसला. तो पुरता हादरला आणि ओक्साबोक्सी रडू लागला.
जुळ्या मुलांचा बाप झाल्याचा आनंद असताना बाळांचा चेहरा पाहिल्यानंतर रडणाऱ्या वडिलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक महिला बेडवर आहे आणि तिच्या हातात दोन बाळ आहेत. तर तिच्याशेजारी एक पुरुष जो तिचा नवरा आहे, तो बसला आहे.
advertisement
हे जोडपं गोरं आहे, त्यांचे केस सोनेरी आहेत. पण त्यांना झालेल्या जुळ्या मुलांची त्वचा काळी आणि केसही काळे. हे पाहून ही मुलं आपली नाहीत, आपण यांचा बाप नाही, असं म्हणत पुरुषांना त्या मुलांना नाकारल्याचं व्हिडीओत दिसतं. आपला नवरा आपल्या बाळांना नाकारत आहे हे पाहून महिलाही रडते आहे.
दरम्यान व्हिडीओ खरा की खोटा यावर प्रश्न निर्माण झाला आहे कारण सध्या व्हिडीओ बनवण्यासाठी एआयचा वापर केला जात आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाहिल्यावर हा व्हिडीओ खोटा असून, ही एआयची जादू असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी हा व्हिडीओ खरा असल्याचं म्हटलं आहे.
advertisement
काहींनी या व्हिडीओतील त्रुटी काढल्या आहेत. पहिलं म्हणजे बाळाची कोणतीच हालचाल दिसत नाहीये, नवजात बाळ रडत असतात, अस्वस्थ असतात. दुसरं म्हणजे वडिलांच्या हाताच्या हालचाली अनैसर्गिक दिसत आहेत. तिसरं बॅकग्राऊंडची लाइट काही सुसंगत नाही. lilyreign_16 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा.
advertisement
सध्या अशा बनावट व्हिडिओंमध्ये वाढ झाली आहे. परिणामी लोक कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू शकत नाहीत. हा व्हिडिओ याचाच परिणाम आहे. तुम्हाला या व्हिडीओबाबत काय वाटतं आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
view comments
मराठी बातम्या/Viral/
बाबा होण्याचा आनंद! बायकोने दिला जुळ्यांना जन्म, पण बाळांना पाहताच हादरला नवरा, ओक्साबोक्सी रडू लागला
Next Article
advertisement
BMC Election: कुठं जुळलं, कुठं बिनसलं? राज्यातील महापालिकांमधील युती-आघाडीचं चित्र एका क्लिकवर
कुठं जुळलं, कुठं बिनसलं? राज्यातील महापालिकांमधील युती-आघाडीचं चित्र एका क्लिकवर
  • राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आजपासून अधिकृतपणे सुरू झाली आहे.

  • मेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होताच राजकीय हालचालींना वेग आला

  • काही महापालिकांमध्ये जुनी राजकीय समीकरणं विस्कटताना दिसत आहेत

View All
advertisement