मुलगी रात्री ओरडायची, रूममधून विचित्र आवाज; वडिलांना सापडलं असं काही, VIDEO पाहणारेही हादरले
- Published by:Priya Lad
Last Updated:
Shocking Video Viral : दररोज रात्री मुलीच्या बेडरूममध्ये होणारी ही हालचाल ज्यामुळे वडील घाबरले होते. एक दिवस तिच्या बेडरूममध्ये शोधाशोध केली आणि शेवटी तिच्या बेडमध्ये जे सापडलं ते पाहून सगळे हादरले.
नवी दिल्ली : अनेक आठवडे त्यांची मुलगी रात्री रडत आणि ओरडत होती. खोलीतून विचित्र आवाज येत होते, भिंतींवर सावल्या दिसत होत्या आणि बेड हलत होता. दररोज रात्री मुलीच्या बेडरूममध्ये होणारी ही हालचाल ज्यामुळे वडील घाबरले होते. एक दिवस तिच्या बेडरूममध्ये शोधाशोध केली आणि शेवटी तिच्या बेडमध्ये जे सापडलं ते पाहून सगळे हादरले.
ग्वाटेमाला सिटीमधील ही धक्कादायक घटना आहे. मुलीला अचानक कोणीतरी तिच्या खोलीत आहे असं वाटू लागलं. यामुळे खूप घाबरत होती. ती तिच्या वडिलांना सांगायची की कुणीतरी तिला स्पर्श करत आहे. त्यानंतर वडील तिला मानसोपचारतज्ज्ञाकडेही घेऊन गेले, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी शेजाऱ्यांच्या आग्रहावरून वडिलांनी स्थानिक प्रीस्टला बोलावलं. त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक आहे.
advertisement
व्हिडीओत तुम्ही पाहून शकता सुरुवातीला एक लहान मुलगी घाबरून रडताना दिसत आहे. त्यानंतर एक व्यक्ती बेडजवळ आहे, जी प्रीस्ट आहे. त्यानंतर ती दुसऱ्या व्यक्तीला जे मुलीचे वडील आहेत त्यांना त्या कापलेल्या भागातून बेडच्या आत हात घालायला सांगते. त्या व्यक्तीला त्या बेडमध्ये एक काळी पिशवी सापडते. ही पिशवी उघडून पाहतात तर त्यात असं काही दिसतं की ते सगळे हादरतात.
advertisement
व्हिडीओच्या पोस्टमध्ये दिल्ल्या माहितीनुसार प्रीस्टने सांगितलं, "मी खोलीत पाऊल ठेवताच मला एक काळी ऊर्जा जाणवली. ती पलंगातून येत होती." त्याने त्यावर क्रॉस लावला पण ऊर्जा अधिक मजबूत झाली. त्याने प्रथम चाकूने पलंगाचा एक भाग कापला आणि नंतर वडिलांना हात आत घालून तो तपासण्यास सांगितलं, जेणेकरून लोकांना असं वाटू नये की प्रीस्टने स्वतःच आत काहीतरी ठेवलं. वडिलांना आत एक लहान काळी पिशवी सापडली.
advertisement
पिशवी उघडल्यावर सगळे घाबरले. त्या पिशवीत एक लहान मेणाची बाहुली होती, त्यावर खिळे टोचलेलं होतं. बाहुलीच्या डोक्यावर बांधलेले केस मुलीच्या केसांसारखे होते. त्यासोबत काही वाळलेल्या औषधी वनस्पती, काळे दगड आणि विचित्र खुणा असलेला कागद होता.
advertisement
advertisement
पुजाऱ्याने सांगितलं, हा काळ्या जादूचा एक प्रकार होता. लॅटिन अमेरिकेत, विशेषतः ग्रामीण ग्वाटेमालामध्ये अशी वूडू किंवा ब्रुजेरिया जादू सामान्य आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याला इजा करण्यासाठी शत्रू बेड किंवा उशाखाली असे गुच्छ लपवतात. ती बाहुली मुलाचं प्रतिबिंब होती आणि त्यावरील खिळे तिच्या वेदनांचे प्रतीक होते. काही महिन्यांपूर्वी या कुटुंबाचा शेजाऱ्याशी जमिनीवरून वाद झाल्याचं वृत्त आहे. हेच काळ्या जादूचं कारण आहे, असा अंदाज त्यांनी बांधला.
advertisement
(सूचना : हा लेख फक्त व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. व्हिडीओत करण्यात आलेल्या दाव्याचं समर्थन न्यूज18मराठी करत नाही. कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रयत्न न्यूज18मराठीचा नाही.)
view commentsLocation :
Delhi
First Published :
November 05, 2025 10:43 AM IST
मराठी बातम्या/Viral/
मुलगी रात्री ओरडायची, रूममधून विचित्र आवाज; वडिलांना सापडलं असं काही, VIDEO पाहणारेही हादरले


