advertisement

डीपीतला फ्यूज काढला, गावात अंधार, चोरट्यांनी घर लुटलं, नऊ लाख आणि दागिने लंपास, बीडच्या गावात धाडसी चोरी

Last Updated:

पोपट मच्छिंद्र कोठुळे यांच्या घरातील नऊ लाख रुपये रोकड आणि अडीच तोळे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत.

बीड पाटोदा चोरी
बीड पाटोदा चोरी
सुरेश जाधव, प्रतिनिधी, बीड: गावातील विद्युत डीपीमधील फ्यूज काढून गावात घरफोडी केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या पाटोदा तालुक्यातील जवळाला उघडकीस आला. चोरांनी एकाच रात्रीत दोन घरे फोडून लाखो रुपयांचा ऐवज आणि रोकड लंपास केली आहे.
पोपट मच्छिंद्र कोठुळे यांच्या घरातील नऊ लाख रुपये रोकड आणि अडीच तोळे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. या धाडसी चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. या प्रकरणात पाटोदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माझ्या मुलाने ऊस तोडणी करून मोठा कष्टाने कमवलेले पैसे चोरांनी नेले आहेत, आमचे पैसे आम्हाला परत मिळवून द्या, अशी मागणी कोठुळे कुटुंबातील महिलांनी केली. कष्टाने कमावलेले पैसे चोरीला गेल्याने कुटुंबियांना भावना अनावर झाल्या होत्या.
advertisement

चोरी कशी झाली?

जवळाला गावातील पोपट मच्छिंद्र कोठुळे यांच्या घरात मध्यरात्री कडी कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील नऊ लाख रुपयांची रक्कम आणि अडीच तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. सकाळी उठून पाहिले असता घरातील कपाट उघडे आणि अस्ताव्यस्त पडलेले कपडे पाहून चोरी झाल्याचा कोठुळे कुटुंबाच्या लक्षात आले. त्याआधी चोरट्यांनी गावातील विद्युत डीपीमधील फ्यूज काढून गावात सगळीकडे अंधार केला.
advertisement
यानंतर कोठुळे कुटुंबाने पोलीस स्टेशन गाठत अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दिली आहे. या धाडसी चोरीमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
डीपीतला फ्यूज काढला, गावात अंधार, चोरट्यांनी घर लुटलं, नऊ लाख आणि दागिने लंपास, बीडच्या गावात धाडसी चोरी
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement