advertisement

Hit Movie: 44 कोटींचा बजेट असलेल्या चित्रपटाने 342 कोटी कमावले, दिग्दर्शक अन् अभिनेताही रातोरात झाले फेमस

Last Updated:
सत्य घटनेवर आधारित तयार झालेला हा चित्रपट 2019 मध्ये रिलीज झाला होता. 44 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या ह्या बॉलिवूड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. शिवाय, चार राष्ट्रीय पुरस्कारांवरही त्या चित्रपटाने नाव कोरले. या चित्रपटामुळे फक्त मुख्य अभिनेत्यालाच नाही तर, दिग्दर्शकालाही रातोराच प्रसिद्धी मिळाली. नेमका हा चित्रपट कोणता? जाणून घेऊया...
1/6
 बॉलिवूडमध्ये दिवसेंदिवस बिग बजेट चित्रपट मोठ्या प्रमाणावर बनवले जात आहेत. 500 कोटी किंवा त्याहून अधिक खर्चाचे चित्रपट आता मोठ्या प्रमामावर बनवले जात आहेत. आता अशातच सध्या नितेश तिवारी दिग्दर्शित, 'रामायण' चित्रपटाच्या बजेटची चर्चा सध्या अख्ख्या जगभरात सुरू आहे. बॉलिवूडमधील सर्वाधिक महागड्या चित्रपटांपैकी एक हा चित्रपट आहे.

2/6
 चित्रपटांचं सक्सेस केवळ त्याच्या बजेटवरून ठरवले जात नाही. अनेक कमी बजेटच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत प्रभावी कलेक्शनची नोंद केली आहे. कधीकधी, कमी बजेटच्या चित्रपटांनाही दमदार कथा आणि प्रभावी सादरीकरणाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

3/6
 अनेक चित्रपटांची प्रदर्शनावेळी फारशी चर्चा पाहायला मिळत नाही, परंतु ते चित्रपट प्रदर्शित झाल्यावर इतिहास घडवतात. अशीच एक वॉर ड्रामा फिल्म म्हणजे, "उरी: द सर्जिकल स्ट्राइक"... या चित्रपटामध्ये लीड रोल साकारणारा अभिनेताही नवखा होता आणि दिग्दर्शक सुद्धा. दिग्दर्शक आदित्य धर यांच्या चित्रपटाचे 2019 साली संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणावर चाहत्यांकडून कौतुक केले गेले.

4/6
 उल्लेखनीय म्हणजे, इतक्या भव्य दिव्य सादरीकरणानंतरही, हा चित्रपट कमी बजेटमध्ये बनवण्यात आला आणि बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवत त्या चित्रपटाचा 2018 मधील हिट चित्रपटांच्या यादीमध्ये समावेश झाला. "उरी: द सर्जिकल स्ट्राइक" हा चित्रपट आदित्य धर यांनी दिग्दर्शित केला होता आणि चित्रपटामध्ये विकी कौशलने मुख्य भूमिका साकारली होती.

5/6
Yami gautam Aditya
2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने देशभक्तीच्या भावनेने आणि अनेक संवादांनी प्रेक्षकांचे मन जिंकले. चित्रपट किती कुशलतेने बनवला गेला आहे हे पाहून फिल्म इंडस्ट्रीतले लोकही प्रभावित झाले.
advertisement
6/6
 44 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या, "उरी: द सर्जिकल स्ट्राइक" चित्रपटाने जगभरात ३४२.७३ कोटी रूपयांची कमाई केली आहे. "उरी" हा त्या वर्षीच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये होता.

बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement