advertisement

कात्री अन् अडकित्त्याने जन्मदात्रीचा निर्घृण खून, अहिल्यानगरमधील मुलाच्या क्रूरतेने महाराष्ट्र सुन्न

Last Updated:

किरकोळ कारणावरून आई-मुलामध्ये वाद झाला अन् या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले

News18
News18
साहेबराव कोकणे, प्रतिनिधी
अहिल्यानगर : शहरातील सावेडी उपनगरात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली असून पोटच्या मुलानेच आपल्या आईचा निर्घृण खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुलमोहर रस्त्यावरील नवलेनगर परिसरात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला असून नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवलेनगर परिसरात राहणाऱ्या बेबी गवारे यांचा त्यांच्याच मुलगा सुहास गवारे उर्फ मामा याने घरगुती वादातून निर्घृण खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. किरकोळ कारणावरून आई-मुलामध्ये वाद झाला अन् या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापाच्या भरात सुहासने आईला मारहाण करत भिंतीवर आपटले. त्यानंतर कात्री आणि अडकित्त्याच्या सहाय्याने तिच्यावर वार करत तिचा निर्घृण खून केला.
advertisement

नवलेनगर परिसरात मोठी खळबळ

या भीषण घटनेनंतर आरोपी सुहास गवारे याने स्वतःलाच घरात कोंडून घेतले होते. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे आणि पोलीस निरीक्षक जगदीश बांबळ यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पोलिसांनी दरवाजा उघडून आरोपीला ताब्यात घेतले आणि मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. या घटनेमुळे नवलेनगर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शेजारी आणि परिसरातील नागरिकांनी तीव्र धक्का व्यक्त केला आहे. बेबी गवारे या शांत आणि प्रेमळ स्वभावाच्या होत्या. मुलानेच आईचा अशाप्रकारे खून  केल्याने नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
advertisement

पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल

या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सुहास गवारे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू असून खुनामागील नेमके कारण आरोपीची मानसिक अवस्था तसेच घटनाक्रमाचा सखोल तपास केला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जगदीश बांबळ यांनी दिली.

संपूर्ण शहरात शोककळा

advertisement
दरम्यान, घरगुती वादातून इतक्या टोकाची हिंसक घटना घडल्याने कौटुंबिक नातेसंबंधांतील तणाव आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेने संपूर्ण शहरात शोककळा पसरली असून, अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी सामाजिक पातळीवर जनजागृतीची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कात्री अन् अडकित्त्याने जन्मदात्रीचा निर्घृण खून, अहिल्यानगरमधील मुलाच्या क्रूरतेने महाराष्ट्र सुन्न
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement