advertisement

PM मोदींच्या चष्म्याने लक्ष वेधलं, डोळ्यांवर लावताच तुम्हीही थक्क व्हाल; भारताच्या पहिल्या AI वेअरेबलची जगभरात चर्चा

Last Updated:

AI Impact Summit 2026: ‘इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चष्म्यासारखं दिसणारं एक स्मार्ट वेअरेबल डिव्हाइस वापरताना दिसले. काय आहे हे डिव्हाइस याची चर्चा आता सुरू झाली आहे.

News18
News18
भारताच्या AI क्षेत्रातील महत्त्वाकांक्षेला नवं रूप देणारी एक झलक ‘इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026’मध्ये पाहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कार्यक्रमादरम्यान चष्म्यासारखं दिसणारं एक स्मार्ट वेअरेबल डिव्हाइस वापरताना दिसले. या डिव्हाइसचं नाव आहे Sarvam Kaze पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित AI वेअरेबल.
Sarvam Kaze नेमकं काय आहे?
Sarvam Kaze हे साधं स्मार्ट ग्लास नाही. हे AI-आधारित वेअरेबल युझर्सचे बोलणं ऐकू शकतं, ते समजू शकतं आणि तत्काळ प्रतिसाद देऊ शकतं. इतकंच नाही तर युझर जे पाहतो, तेही हे डिव्हाइस रिअल-टाइममध्ये प्रोसेस करू शकतं.
पारंपरिक AI टूल्स मोबाईल किंवा संगणकाच्या स्क्रीनपुरते मर्यादित असतात. मात्र Sarvam Kaze हे AI थेट आवाज आणि दृश्यांच्या माध्यमातून भौतिक जगात आणण्याचा प्रयत्न करते. CNBC-TV18च्या माहितीनुसार कंपनी याच आठवड्यात या प्लॅटफॉर्मवर चॅट फीचरही लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
advertisement
‘मेड इन इंडिया’ AI उत्पादन
Sarvam Kaze हे देशातील स्टार्टअप Sarvam AI ने विकसित केलं आहे. डिझाईनपासून ते तांत्रिक विकासापर्यंत संपूर्ण उत्पादन भारतातच तयार करण्यात आलं आहे. कंपनी स्वतःला पूर्णपणे स्वदेशी AI प्रॉडक्ट म्हणून सादर करत आहे. याशिवाय डेव्हलपर्सना Sarvam प्लॅटफॉर्मवर कस्टम अ‍ॅप्लिकेशन्स तयार करण्याचीही सुविधा असेल. म्हणजेच विशिष्ट गरजांसाठी स्वतंत्र AI-आधारित अनुभव विकसित करता येतील.
advertisement
PM मोदींकडून डिव्हाइसचा वापर
भारत मंडपम येथे 16 ते 20 फेब्रुवारीदरम्यान आयोजित ‘इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026’मध्ये पंतप्रधान मोदी यांनी या डिव्हाइसचा वापर केला. Sarvam AI चे सह-संस्थापक प्रत्युष कुमार यांनी शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये पंतप्रधान प्रदर्शन पाहताना या डिव्हाइसच्या रिअल-टाइम क्षमतांची चाचणी घेत असल्याचं दिसतं. कंपनीच्या माहितीनुसार Sarvam Kaze मे महिन्यात बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
advertisement
Sarvam AI नेमकं काय तयार करत आहे?
Sarvam AI ही भारतीय गरजांनुसार ‘फाउंडेशनल AI मॉडेल्स’ विकसित करणाऱ्या टीम्सपैकी एक आहे. भारतीय भाषांसाठी मोठी भाषा मॉडेल्स (LLMs) आणि स्पीच मॉडेल्स तयार करण्यावर त्यांचा भर आहे.
हे मॉडेल्स व्हॉईस इंटरफेस, डॉक्युमेंट प्रोसेसिंग आणि नागरिक सेवांसाठी उपयोगी ठरणार आहेत.
अलीकडेच कंपनीने काही महत्त्वाची उत्पादनेही सादर केली आहेत त्यामध्ये...
advertisement
  • Sarvam Akshar – दस्तऐवजांचे डिजिटायझेशन
  • Sarvam Studio – बहुभाषिक कंटेंट निर्मितीसाठी प्लॅटफॉर्म
  • Saaras V3 – प्रगत स्पीच रिकग्निशन मॉडेल
IndiaAI मिशनचा मोठा संदर्भ
ही संपूर्ण घडामोड ‘IndiaAI Mission’च्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जाते. मार्च 2024 मध्ये केंद्र सरकारने 10,372 कोटी रुपयांच्या तरतुदीसह हे मिशन सुरू केले.
या मिशनअंतर्गत:
  • 38,000 पेक्षा जास्त GPUs स्टार्टअप्स आणि संशोधकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले
  • 12 टीम्सना स्वदेशी मोठी भाषा मॉडेल्स विकसित करण्यासाठी निवडण्यात आले
  • भारतासाठी विशिष्ट AI अ‍ॅप्लिकेशन्सना पाठबळ देण्यात येत आहे
advertisement
दिल्लीतील या समिटमध्ये धोरणकर्ते, स्टार्टअप्स, संशोधक आणि जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील नेते सहभागी झाले आहेत. जबाबदार आणि नाविन्यपूर्ण AI विकासावर चर्चा होत आहे. भारत आता केवळ AI वापरणारा देश राहिलेला नाही, तर स्वतःची AI उत्पादने आणि मॉडेल्स उभारणारा देश म्हणून पुढे येत असल्याचे संकेत या घटनातून मिळतात.
view comments
मराठी बातम्या/AI/
PM मोदींच्या चष्म्याने लक्ष वेधलं, डोळ्यांवर लावताच तुम्हीही थक्क व्हाल; भारताच्या पहिल्या AI वेअरेबलची जगभरात चर्चा
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement