advertisement

सुहागरात्रीचा आनंद क्षणात संपला, त्या रात्री नववधूला असं काही समजलं की आयुष्य झालं उद्धवस्त

Last Updated:

उत्तर प्रदेशातील कानपूरमधील एका नववधूच्या बाबतीत याच रात्री तिचे सर्व स्वप्न धुळीला मिळाले. एका खोट्या नात्याच्या जाळ्यात अडकलेल्या या तरुणीची कहाणी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

AI Generated photo
AI Generated photo
कानपूर : लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन आणि आयुष्याची एक नवी स्वप्नाची सुरुवात असते. प्रत्येक मुलगी आपल्या सुखाच्या संसाराची स्वप्ने रंगवत सासरी जाते. लग्नाची पहिली रात्र, ज्याला आपण 'सुहागरात' म्हणतो, ती पती-पत्नीच्या नात्यातील जवळीक वाढवणारी एक महत्त्वाची पायरी असते. पण, उत्तर प्रदेशातील कानपूरमधील एका नववधूच्या बाबतीत याच रात्री तिचे सर्व स्वप्न धुळीला मिळाले. एका खोट्या नात्याच्या जाळ्यात अडकलेल्या या तरुणीची कहाणी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
25 एप्रिल 2025 रोजी मोठ्या थाटामाटात या तरुणीचा विवाह हमीरपूरमधील एका तरुणाशी झाला. दागदागिने, मानपान आणि हुंडा मिळून मुलीच्या वडिलांनी तब्बल 38 लाख रुपये खर्च केले. लग्नानंतर नवरी मोठ्या आशेने सासरी पोहोचली. 26 एप्रिलला पतीसोबत ती सासरी आली, पण पहिल्या चार दिवसांत पतीकडून तिला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. सुरुवातीला तिला वाटलं की हे कदाचित थकव्यामुळे किंवा नवीन वातावरणामुळे असेल, पण हा तर एका मोठ्या फसवणुकीचा ट्रेलर होता.
advertisement
काही दिवसांनी हे जोडपे नोएडामध्ये पतीच्या नातेवाईकांकडे वास्तव्याला गेले. तिथे एक महिना उलटला तरी पती शरीरसंबंध ठेवण्यास टाळाटाळ करत होता. जेव्हा पत्नीने जवळ जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पतीने कारणं बनवून तिला दूर लोटले. अखेर काही काळानंतर तिला समजलं की, तिचा पती हा नपुंसक आहे. ही बाब लग्नापूर्वी तिच्यापासून जाणीवपूर्वक लपवून ठेवली गेली होती. केवळ 38 लाख रुपयांच्या हुंड्यासाठी एका मुलीचं आयुष्य पणाला लावलं गेलं होतं.
advertisement
फसवणूक इथेच थांबली नाही. लग्नाच्या वेळी पतीकडे स्वतःचा 'थ्री बीएचके' फ्लॅट असल्याचं सांगण्यात आलं होतं, पण प्रत्यक्षात तो फ्लॅट त्याच्या काका-काकूंचा निघाला. जेव्हा पीडितेने या नपुंसकतेबद्दल जाब विचारला, तेव्हा पतीने तिची माफी मागण्याऐवजी तिला चक्क जीवे मारण्याची धमकी दिली. "जर ही गोष्ट बाहेर सांगितलीस, तर तुला संपवून टाकीन," असे शब्द पतीने उच्चारले. सासरच्या मंडळींनीही तिला मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली.
advertisement
हळूहळू सासरच्यांचा छळ वाढत गेला. त्यांनी पीडितेचे 16 ते 17 लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम हिसकावून घेतली. 25 ऑक्टोबर 2025 रोजी तिला घराबाहेर काढून देण्यात आले. "तुला काय करायचे ते कर, आम्ही कोणालाही घाबरत नाही," असे म्हणत त्यांनी तिला वाऱ्यावर सोडले. अखेर 112 नंबरवर कॉल करून तिने स्वतःचा जीव वाचवला आणि 26 ऑक्टोबरला ती आपल्या माहेरी कानपूरला परतली.
advertisement
सध्या या प्रकरणी कानपूरच्या रावतपूर पोलीस ठाण्यात पतीसह तीन जणांविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. पोलीस स्टेशनचे प्रभारी कमलेश राय यांनी सांगितले की, पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. अनेकदा श्रीमंती आणि देखाव्याला भुलून लग्नाचे निर्णय घेतले जातात. पण, अशा घटना आपल्याला सावध करतात की, लग्नापूर्वी केवळ आर्थिक स्थितीच नाही, तर आरोग्य आणि चारित्र्याची शहानिशा करणे किती गरजेचे आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
सुहागरात्रीचा आनंद क्षणात संपला, त्या रात्री नववधूला असं काही समजलं की आयुष्य झालं उद्धवस्त
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement