Manoj Jarange Patil: 'ती' 22 प्रकरणं माझ्या हातात,भयानक मॅटर', मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
- Published by:Sachin S
Last Updated:
तुमची एवढी प्रकरणं आहेत माझ्याकडे तरी मी अजून त्यात हात घातलेला नाही. तुमची लाभार्थी टोळी माझ्या विरोधात
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यामध्ये पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. "धनंजय मुंडे यांचे माझ्याजवळ 22 प्रकरणं आली आहेत, त्यामुळे तुम्ही शहाणे हो. धनंजय मुंडे इथून पुढे तरी माझ्या नादाला लागू नका, तुमची खूप प्रकरण माझ्याकडे आली आहेत' असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आता नवीन प्रकरणाचा उल्लेख करत इशाराच दिला आहे.
advertisement
मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले.
"फक्त मंत्रिपद द्यायचं म्हटलं होतं तर अजितदादांचा पक्ष एवढा ट्रोल झाला होता, त्यामुळे दिलं तर पक्ष संपेल, भाजप कशाला हाताने हे गळ्यात गुंतून घेईल. रक्ताने हात भरलेल्या लोकांना सरकार का सांभाळेल? भाजपमध्ये गेले तरी भाजप का मंत्रिपद देईल? संतोष भैया देशमुख यांना अजून न्याय नाही, त्यांचा खून करण्यात आला त्याच्याच कार्यकर्त्यांकडून आणि त्याला मंत्रिपद देणार का? राष्ट्रवादी तर देणार नाही कारण देण्या अगोदर त्यांचे एवढे हाल आहेत तर दिल्यावर तर पूर्ण पक्ष संपेल. रक्ताने हात भरलेल्या लोकांवर कधीच बोलायचं नाही, यामुळे माझा दिवस चांगला जात नाही' असं म्हणत जरांगेंनी धनंजय मुंडेंना टोला लगावलाा.
advertisement
तसंच, 'घातपाताच्या सुपारी देऊन त्याने पुन्हा आमचेच लोक स्टॅन्ड केले आहेत? आम्ही पूर्ण माहिती घेत आहोत. काळजी करू नको अजूनही सांगतो धनंजय मुंडे यांनी आमच्या नादी लागू नये. आमचे लोक घातपात करून पुन्हा उचकवून देऊ नये. तुमची एवढी प्रकरणं आहेत माझ्याकडे तरी मी अजून त्यात हात घातलेला नाही. तुमची लाभार्थी टोळी माझ्या विरोधात तू कशी लावली हे मला चांगलं माहित आहे, तुम्ही बदनाम करत आहे, मला हे देखील चांगलं माहित आहे. तुमची एवढी प्रकरणं माझ्याकडे आली आहेत, मी अजून त्यात हात घातलेला नाही. एक महिला नागपूरवरून माझ्याकडे आली होती, आणि त्यांनी सांगितलेलं एवढं भयानक मॅटर आहे, त्यामुळे तुम्ही सावध राहा, असा इशाराच मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंना दिला.
advertisement
'मी एकच बोललो आहे, ही महिला आज सकाळी येऊन माझ्या घरी खूप रडत होती. तिचा नवरा देखील मेलेला आहे, याच्याच टेन्शनमुळे. मी फक्त त्याला संदेश दिला आहे की, तुझे पण खूप प्रकरण माझ्याकडे आले आहेत. तुम्ही आमच्याच लोकांना घातपाताच्या सुपार्या देत आहे, ते गप्प बसलेले होते, तरी तुझ्याचं टोळीने कसं उचकवलं त्यांना पुन्हा हे मला माहिती आहे. माझे काहीच प्रकरण नाहीत, माझ्यावर केलेल्या प्रत्येक आरोपावर मी जर फौजदारी खटले दाखल केले तर माझ्या विरोधात बोलणाऱ्याला जेलची शिक्षा भोगावी लागणार आहे. त्यामुळे आता शहाणा हो माझ्या नादी लागू नकोस, मी जर मागे लागलो तर तुझे माझ्याजवळ 22 पेक्षा अधिक प्रकरण आलेली आहेत' असंही जरांगे म्हणाले.
advertisement
'आंदोलनाची परत वेळ येणार नाही'
मी रात्री विखे पाटील साहेब आणि शंभूराजे देसाई साहेब यांच्याशी बोललो. गॅझेटिअरचा जीआर काढलाय तर अधिकारी असं का करत आहेत, सरकार मोठे की अधिकारी मोठे? आज कॅबिनेटमध्ये आम्ही हा विषय घेतो असं ते म्हणाले. त्यामुळे बघू आता नेमकं हे काय करतात. नसता मला विखे पाटलांच्या आणि सरकारच्या विरोधात जावे लागेल, नाईलाज आहे. मी फक्त ही शंका व्यक्त केली, मला असं वाटत नाही की तसं आंदोलन करण्याची पुन्हा मराठ्यांवर वेळ येईल, असंही जरांगे म्हणाले.
advertisement
'पुन्हा आंदोलन झालं तर सरकार अडचणीत येईल'
"फडणवीस, शिंदे साहेबांनी आणि विखे पाटील साहेबांनी मराठ्यांना आरक्षण दिला आहे. त्यामुळे काहींची पोट दुखी सरकार मधील असू शकते पण यांनी गोरगरिबांचा कधीही अवमान करू नये, पुन्हा जर मराठ्यांच्या नादी लागला तर अवघड होईल. माझं प्रामाणिक मत आहे सरकारला तुम्ही जीआर काढला आहे, त्यामुळे आता मराठ्यांना प्रमाणपत्र वाटप करायला हरकत नाही. व्हॅलिडीटी जाणून बुजून देत नाहीत. शिंदे समितीला मुदतवाढ दिली, त्यामुळे शिंदे समिती का नोंदी शोधत नाही या प्रश्नाचे उत्तर आम्हाला द्या की आम्हाला आंदोलन करावे लागेल. सारथी बद्दलही सांगितलx, अण्णासाहेब विकास आर्थिक महामंडळाबद्दल देखील त्यांना सांगितलं. आम्ही आठ दहा मुद्दे त्यांना सांगितले आहेत, मी या अधिवेशनानंतर ऐकणार नाही, असं स्पष्ट सांगितलेला आहे. पुन्हा जर मी आंदोलनाच्या भूमिकेत आलो, तर प्रचंड अडचणीत सरकार येईल, असा इशाराही जरांगेंनी
Location :
Aurangabad Cantonment,Aurangabad,Maharashtra
First Published :
Feb 17, 2026 7:18 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manoj Jarange Patil: 'ती' 22 प्रकरणं माझ्या हातात,भयानक मॅटर', मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा










