advertisement

Special Report: अजितदादांचा ब्लॅकबॉक्स जाळला की जळाला? संभाषणाचा डेटा मिळाला!

Last Updated:

अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी शंकांच धुकं काही दूर होण्याचं नाव घेत नाही.

अजित पवार
अजित पवार
मुंबई : अजित पवार यांचा विमान अपघात की घातपात यावरून अनेक शंका, संशय आणि प्रश्नांचं वादळ उठलं. आरोप प्रत्यारोप झाले. पण या सगळ्याचा उलगडा ज्या ब्लॅक बॉक्समधून होईल अशी आशा होती तो ब्लॅक बॉक्सच जळाल्याचं कळतंय. त्यामुळे उलगडा होणं सोडं नव्या प्रश्नांची भर घालत विरोधकांनी आणि अगदी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही प्रश्नांच्या फैरी झाडायला सुरुवात केलीय.

दादांच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स जळाला की सुरक्षित? रोहित पवारांचे सवाल, अपघाताविषयी गूढ वाढलं

अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी शंकांच धुकं काही दूर होण्याचं नाव घेत नाही. रोहित पवारांनी दादांच्या अपघाताविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. अपघात का आणि कसा घडला? त्या अपघाताला जबाबदार कोण असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. दरम्यान विमानातील ब्लॅक बॉक्स विषयीही आता शंका उपस्थित केली जात आहे.
advertisement

'दाल में कुछ काला है?'

'त्या' विमानाचा ब्लॅक बॉक्स जळाल्याची माहिती मिळते आहे, 'ब्लॅक बॉक्समधून काहीही मिळणार नाही', असे काँग्रेसचे अतुल लोंढे म्हणाले. तर ब्लॅक बॉक्स खराब झाला म्हणतात याचा अर्थ 'दाल में कुछ काला है' असे म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अपघाताबाबत शंका उपस्थित केली.
खरं तर काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या विमान दुर्घटनेबाबत आमदार रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत अनेक सवाल उपस्थित केले होते.
advertisement
दृश्यमानता कमी असताना लँडिंगचा अट्टहास का केला? रनवे 29 उपलब्ध असताना 11 वर उतरण्याचा आग्रह का? विमान लँड होण्याआधीच कमी उंचीवर आणण्यात आलं का? फ्लाईट रडारचा एक मिनिटाचा आधीच बंद पडलेला डेटा कुठे गेला? विमान कोसळताना पायलट एक शब्दही का बोलला नाही? अपघातापूर्वी 3-4 मिनिटांत मुख्य पायलट एक शब्दही का बोलले नाहीत? अशा सवालांच्या फैरी रोहित पवारांनी डागल्या होत्या. आता त्यांनी ब्लॅक बॉक्सविषयी शंका उपस्थित केलीय. ब्लॅक बॉक्स राजकारणापासून सुरक्षित नाही, असे सूचक वक्तव्य रोहित पवार यांनी केले.
advertisement
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेनंतर तपास यंत्रणांकडून विमानाचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली जातेय.

ब्लॅक ब्लॅक्स म्हणजे काय? त्याचे काय काम असते?

ब्लॅक बॉक्समध्ये विमानाच्या उड्डाणादरम्यान कॉकपिटमधील संभाषण आणि उड्डाणाचा डेटा रेकॉर्ड केला जातो. ब्लॅक बॉक्सचा रंग नारंगी असतो. विमानाच्या (टेल) शेपटीकडील भागात असतो. विमानाचा ब्लॅक बॉक्स विपरीत परिस्थितीतही सुरक्षित राहावा अशा पद्धतीनं बनवला जातो. साधारणपणे 1100 अंश सेल्सिअस तापमानात तो सुरक्षित राहू शकतो.. आगीव्यतिरिक्त,हा बॉक्स 6 हजार मीटर खोलीपर्यंत समुद्राच्या पाण्यात, तसेच 750 किमी प्रती तास वेगानं आदळल्यास तो सुरक्षित राहतो. तज्ज्ञ सांगतात ब्लॅक बॉक्स जळू शकत नाही.1 तासाहून अधिक काळ 1100 डिग्री सेंटिग्रेट तापमान लागतं
advertisement

अमोल मिटकरी यांचे सूचक ट्विट

विमानाच्या ब्लॅक बॉक्सबाबत सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत असताना अमोल मिटकरींनी एक सूचक ट्विट केलंय. विमानाचा ब्लॅक बॉक्स हा त्याच्या टेलमध्ये, म्हणजे त्याच्या शेपटीमध्ये असतो. त्याचं कारणच हे असतं की, ज्यावेळी विमानाचा अपघात होतो, त्यावेळी अनेकदा असं निदर्शनास आलंय की, विमानाची टेल ही पूर्णपणे जळत नाही. त्यामुळंच हा ब्लॅक बॉक्स विमानाच्या टेलमध्ये ठेवला जातो. अपघात झाला त्या विमानाची शेपटी ही पूर्णपणे सुस्थितीत आहे. ती अजिबात जळालेली नाहीये. त्यामुळं या ब्लॅक बॉक्सला काहीही डॅमेज होण्याचा संबंध येत नाही. तसेच ब्लॅक बॉक्स असा बनवला गेला असतो की हाय टेम्परेचरमध्ये सुद्धा कितीही आग लागली तरीही ते जळून खाक होत नसतो. आता हा प्रश्न उपस्थित होतो की अपघात झाला त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स कसा जळला? असा सवाल मिटकरींनी केलाय.
advertisement
तर अजित दादांच्या विमान अपघाताबाबत सत्य समोर यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी केलीय. काल कळलं की ब्लॅक box देशाच्या बाहेर जाणार आहे हे चुकीचे आहे आम्हाला राजकारण नकोय आम्हाला सत्य समोर येणं गरजेचं आहे, असे त्या म्हणाल्या.

AAIB अर्थात विमान अपघात तपास संस्थेनं काय म्हटलंय?

एकीकडे ब्लॅक बॉक्सबाबत विविध शंका उपस्थिते केल्या जात असताना AAIB अर्थात विमान अपघात तपास संस्थेनं निवेदन जारी केलंय. अजित पवारांच्या विमानात दोन रेकॉर्डर होते. ते बराच वेळ आगीत जळाल्यामुळे रेकॉर्डरला नुकसान झालं आहे. त्यापैकी एल 3- कम्युनिकेशन्सनं तयार केलेला डिजिटल फ्लाइट डेटा मिळवण्यात यश आलंय. कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डरवर सखोल तांत्रिक तपास सुरू आहे. कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर हनीवेल कंपनीनिर्मित असून संबंधित देशातील अधिस्वीकृत प्रतिनिधींची मदत मागितलेली आहे. तर्क वितर्क लावण्याऐवजी तपास प्रक्रियेवर विश्वास ठेवण्याचे आवाहन विमान अपघात तपास संस्थेकडून करण्यात आले आहे.
advertisement
https://youtu.be/xyPbXq-hVl8

ब्लॅक बॉक्समध्ये असलेली माहिती समोर आल्यानंतर अपघाताच्या कारणाचा उलगडा होणार

अजित पवारांच्या विमान अपघातात अनेक प्रश्न उपस्थित केले जाताहेत. या सर्व पार्श्वभूमीवर ब्लॅक बॉक्समध्ये असलेली माहिती समोर आल्यानंतर अपघाताच्या कारणाचा उलगडा होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Special Report: अजितदादांचा ब्लॅकबॉक्स जाळला की जळाला? संभाषणाचा डेटा मिळाला!
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement