मोठी बातमी! विद्यार्थिनीचा शाळेतच हार्टअटॅकने मृत्यू; काही दिवसातच जिल्हा परिषदेने घेतला मोठा निर्णय

Last Updated:

विद्यार्थ्यांची शाळेच्या ताणातून सुटका होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं मोठा निर्णय घेतला आहे.

+
News18

News18

बीड, 18 ऑगस्ट : आपली मुलं शिकून मोठी व्हावीत असं प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं. त्यासाठी ते मुलांना चांगलं शिक्षण कसं मिळेल याचा प्रयत्न करतात. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना दिवसभराची शाळा, कोचिंक क्लासेल आणि उरलेल्या वेळेत होमवर्क यामुळे विद्यार्थ्यांना मोठा ताण सहन करावा लागतो. या तणावातून सुटका होण्यासाठी बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय.
काय आहे निर्णय?
शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व शाळांची ( विशेषत: खासगी इंग्रजी शाळा) वेळ साडेपाच तासांपेक्षा जास्त नसावी, असा आदेश काढला आहे. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत अतिरिक्त थांबवून त्यांच्याकडून अभ्यास घेतला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांवरचा ताण वाढतो. त्यामुळे शाळेतील अध्यापनाचे काम हे साडेपाच तासांपेक्षा जास्त नसावं. विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार हसत-खेळत पद्धतीनं शिकवावं, असं शिक्षण विभागानं स्पष्ट केलंय.
advertisement
मुलांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्याचा विचारही शाळांनी करावा , गरजेपुरतीच वहया पुस्तके आणण्यास सांगावीत, सर्व विषयांसाठी एकच वही ठेवावी. उर्वरीत पुस्तके शाळेतच ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी. मुलांचे पाठीवरील दप्तराचे ओझं कमी करण्यासाठी शाळांनी सर्व उपाय करावेत, असं या आदेशात स्पष्ट करण्यात आलंय.
advertisement
बीड शहरात काही दिवसांपूर्वी एका इंग्रजी शाळेत मुलीचा वर्गातच हार्ट अटॅकनं मृत्यू झाला होता. ही घटना घडल्यानंतर जिल्ह्यातील शिक्षण तज्ज्ञ तसंच सामाजिक संघटनांनी अध्यापनाच्या वेळेत बदल करावा अशी मागणी केली होती. त्यानंतर शिक्षण विभागानं हे आदेश दिले आहेत.
advertisement
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
मोठी बातमी! विद्यार्थिनीचा शाळेतच हार्टअटॅकने मृत्यू; काही दिवसातच जिल्हा परिषदेने घेतला मोठा निर्णय
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement