Beed News : मूर्ती कामगार ते आज यशस्वी व्यावसायिक, लखपती झालेल्या व्यक्तिची कहाणी

Last Updated:

मूर्तीकार हनुमंत चिरके यांनी अगदी छोट्याशा कामगारापासून सुरुवात केली. ती आज अगदी मोठ्या व्यवसायात झाली आहे. वर्षानुवर्षे या ठिकाणी नवनवीन अशा आकर्षक मूर्ती त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात.

+
गणपती

गणपती मूर्तीकार सक्सेस स्टोरी

प्रशांत पवार, प्रतिनिधी
बीड : दरवर्षीप्रमाणे गणेश उत्सव हा काही थोड्याच दिवसांवर आला आहे. अनेक ठिकाणी बाप्पाची मूर्ती बनवण्याचे काम हे अजूनही चालूच आहे. याच निमित्ताने आपण आज बीडमधील गणेश मूर्ती बनवणाऱ्या हनुमंत चिरके या मूर्तिकाराची कहाणी जाणून घेणार आहोत.
मूर्तीकार हनुमंत चिरके यांनी अगदी छोट्याशा कामगारापासून सुरुवात केली. ती आज अगदी मोठ्या व्यवसायात झाली आहे. वर्षानुवर्षे या ठिकाणी नवनवीन अशा आकर्षक मूर्ती त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. अगदी छोट्या मूर्तीपासून तर मोठ्या मूर्तीदेखील इथे पाहायला मिळतील.
advertisement
सणानिमित्त गोड पदार्थ खात असाल तर दातांना होईल त्रास, नेमकी काय काळजी घ्यावी?, VIDEO
मागील काही वर्षांपासून हनुमंत चिरके हा व्यवसाय करत आहेत. त्यांनी सुरुवातीला मूर्ती बनवण्याच्या कारखान्यात एक लहान कामगार म्हणून काम केले आहे. गणपती बनवणे, त्याचबरोबर मूर्तीची सजावट करणे आणि रंगरंगोटी करणे या सर्व गोष्टी ते उत्तमरीत्या करत असत. इतकेच नव्हे तर त्यांनी बनवलेल्या मूर्ती या उत्तम क्वालिटीच्या असतात. त्यामुळे ग्राहकही चांगल्या दर्जाच्या गणेशमूर्तींनाच प्राधान्य देतात.
advertisement
दरवर्षी या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने गणेश मूर्तीच्या सजावटी केल्या जातात. प्रत्येक डिझाईन अत्यंत आकर्षक पद्धतीने सजवलेल्या पाहायला मिळतात. सध्या बाप्पाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मूर्तींची संख्या अगदी मोठ्या प्रमाणात दिसत आहे. 2014 पासून केलेली सुरुवात ही आज एका वेगळ्या उंचीवर पोहोचलेली आहे. ग्राहकांच्या या उत्तम क्वालिटीच्या गणेश मूर्तींना चांगला प्रतिसाद मिळतो. आज हनुमंत चिरके आपल्या या व्यवसायाच्या माध्यमातून 10 ते 12 लाखांची कमाई करतात. एक मूर्तीकार ते एक व्यावसायिक असा त्यांचा हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Beed News : मूर्ती कामगार ते आज यशस्वी व्यावसायिक, लखपती झालेल्या व्यक्तिची कहाणी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement