एकाच छताखाली घ्या तब्बल 45 देवींचे दर्शन, पाहा कुठं आहे हे ठिकाण, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
महाराष्ट्रात एकाच छताखाली राजस्थानातील 45 देवीचं दर्शनत घेता येणार आहे.
बीड, 18 ऑक्टोबर: सध्या देशभरात मोठ्या उत्साहात नवरात्री उत्सव साजरा होत आहे. अगदी गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्री उत्सव मंडळांकडूनही आकर्षक सजावट आणि देखावे सादर केले जातात. बीडमध्ये एकाच छताखाली राजस्थानातील देवींच्या तब्बल 45 रुपांचे दर्शन होत आहे. माहेश्वरी सेवाभावी संस्थेच्या वतीने हा भव्य दिव्य देखावा साकारण्यात आलाय.
एकाच छताखाली 45 देवी
बीडमधील युवा माहेश्वरी सेवाभावी संस्थेच्या वतीने दरवर्षी नवरात्री उत्सवात आकर्षक देखावे साकारले जातात. यंदा राजस्थानातील प्रसिद्ध 45 मंदिरांतील देवीची रुपे साकारण्यात आली आहेत. बीड आणि राजस्थान दूरचं अंतर आहे. मात्र, राजस्थानातून अनेक कुंटुंबं व्यवसायासाठी बीडमध्ये वास्तव्यास आहेत. आता एकाच छताखाली बीडकरांना राजस्थानातील देवींचे दर्शन होत आहे.
advertisement
तब्बल आठ लाखांचा खर्च
नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने बीड येथील युवा माहेश्वरी संस्थेच्या माध्यमातून कुलदेवी हा प्रोजेक्ट हाती घेतला आहे. यामध्ये सकल राजस्थानी समाजाच्या तब्बल 45 देवींची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे. यामध्ये ती देवी कुठल्या जिल्ह्यात कोठे स्थित आहे? त्या देवीचा इतिहास, तिथंपर्यंत कसं पोहोचायचं? ही सर्व माहिती या देखाव्याच्या माध्यमातूनच दिली गेली आहे. देवीच्या मूर्ती राजस्थानातून आणल्या असून आम्हाला सात ते आठ लाख रुपयांचा खर्च झाल्याचे व्यवस्थापक युवराज चरखा सांगतात.
advertisement
गेल्या तीन चार वर्षांपासपून आम्हाला ही कल्पना सुचली. आम्ही या माहितीचे संकलन करत होतो. आम्हाला राजस्थानला जाणं शक्य होत नाही. प्रत्येकाच्या कुलदेवी वेगवेगळ्या आहेत. सर्वांना एकाच ठिकाणी दर्शन मिळावं, या हेतूने हा उपक्रम हाती घेतला, असेही चरखा यांनी सांगितलं. विशेष म्हणजे राजस्थानातील देवींसोबतच महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांचं दर्शनही या ठिकाणी होत आहे.
Location :
Bid,Bid,Maharashtra
First Published :
October 18, 2023 12:19 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
एकाच छताखाली घ्या तब्बल 45 देवींचे दर्शन, पाहा कुठं आहे हे ठिकाण, Video