Bhandara News : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठा झटका, बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Last Updated:

भंडाऱ्यामध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. भंडाऱ्यातील शिवसेनेचे लोकसभा युवा सेना अध्यक्ष जाकी रावलानी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आहे.

bhandara news
bhandara news
Bhandara News : येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकींना सूरूवात होणार आहे.त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.या दरम्यान भंडाऱ्यामध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. भंडाऱ्यातील शिवसेनेचे लोकसभा युवा सेना अध्यक्ष जाकी रावलानी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आहे.त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये जाकी रावलानी यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जाते.विधानसभा निवडणुकीत सूक्ष्म नियोजनातही त्यांचा वाटा महत्वाचा आहे,असे शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते सांगतात. तसेट शिवसेनेत जाकी रावलानी यांचे काम पाहूनच त्यांना भंडारा लोकसभेचे युवा सेना अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली होती.
दरम्यान नगर परिषद निवडणुकीच्या आरक्षणानंतर या मैत्रीत वितुष्ठ आल्याची चर्चा होती. तसेच जाकी रावलानी हे काही नेत्यांच्या भेटीगाठी देखील घेते चर्चा करत होते. त्यानंतर आज नरेंद्र बोंडेकर यांचे खंदे समर्थक जाकी रावलानी यांनी भाजपात प्रवेश केला होता.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला होता. यावेळी जिल्ह्यातील नेत्यांच्या कारभाराला कंटाळून पक्ष सोडल्याची माहिती जाकी रावलानी यांनी दिली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ⁠⁠निवडणूकीपूर्वी शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. या पक्षप्रवेशाने भंडाऱ्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Bhandara News : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठा झटका, बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement