भास्कर जाधव यांच्या मनात काय? शिवसेनेवर पुन्हा नाराज! जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर ते विधान चर्चेत

Last Updated:

राज्यातील महापालिका निवडणूक सरताच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे.

भास्कर जाधव-उद्धव ठाकरे
भास्कर जाधव-उद्धव ठाकरे
राजेश जाधव, प्रतिनिधी, रत्नागिरी: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाची मुलूख मैदानी तोफ, आमदार भास्कर जाधव पक्षावर पुन्हा नाराज असल्याचे कळते. माझ्या तालुक्यापुरते मला माहिती आहे, जिल्ह्याचे माहिती नाही, असे म्हणत पक्षाकडून जबाबदाऱ्यांचे असमान वाटप होत असल्याच्या मुद्द्यालाच त्यांनी अप्रत्यक्षपणे हात घातला. तसेच पक्षाकडून ताकद दिली जात नसल्याचे देखील त्यांच्या बोलण्यातून अप्रत्यक्षपणे सूचित होते.

भास्कर जाधव पक्षावर पुन्हा नाराज?

राज्यातील महापालिका निवडणूक सरताच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची जबाबदारी स्वाभाविक पक्षाचे नेते म्हणून भास्कर जाधव यांच्याकडे असणे अपेक्षित आहे. परंतु पक्षाकडून ताकद मिळत नसल्याने जिल्ह्यातील निवडणुकांकडे भास्कर जाधव कानाडोळा करीत असल्याचे जाणवते.
advertisement

भास्कर जाधव यांचा जिल्ह्यातील निवडणुकांकडे कानाडोळा?

शिवसेनेसंबंधी जिल्ह्यातले मला माहिती नाही पण माझ्या मतदारसंघातील तीनही पंचायत समितीमध्ये मी सर्व जागा जिंकेन, असे भास्कर जाधव म्हणाले. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधवांचे विधान राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. भास्कर जाधव यांचा जिल्ह्यातील निवडणुकांकडे काना डोळा होत आहे का? असा सवालही उपस्थित होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भास्कर जाधव माध्यमांपासून दूर आहेत. राज्यातील राजकीय परिस्थिवरही भाष्य करणे टाळत आहेत.
advertisement

माझ्या मतदारसंघातील तीनही पंचायत समिती मी जिंकणार, जिल्ह्याचे मला माहिती नाही

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भास्कर जाधव यांचा केवळ त्यांच्या मतदार संघावर फोकस आहे. भाजपकडून आतापर्यंत पक्ष फोडून झाले, मतदार याद्यात घोळ सुरू आहेत. भरमसाठ पैशांचा वापर करून निवडणुका जिंकण्याचा त्यांचा फंडा आहे. मात्र त्याउलट आमच्याकडे पैसे नाहीत, प्रचंड जनशक्ती आहे. धनशक्तीसमोर जनशक्ती भारी पडेल असा मला विश्वास आहे. माझ्या मतदारसंघातील तीनही पंचायत समिती मी जिंकणार, असे भास्कर जाधव म्हणाले. गुहागरमधील १५ उमेदवारांचे अर्ज भरून झाल्यानंतर भास्कर जाधव माध्यमांशी बोलत होते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भास्कर जाधव यांच्या मनात काय? शिवसेनेवर पुन्हा नाराज! जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर ते विधान चर्चेत
Next Article
advertisement
Silver Price : तुफान आलंय...चांदीच्या दरात त्सुनामी, प्रति किलोचा दर ऐकालं तर  डोळे पांढरे होतील, एक्सपर्टने दिला इशारा
तुफान आलंय...चांदीच्या दरात त्सुनामी, प्रति किलोचा दर ऐकालं तर डोळे पांढरे होती
  • सराफा बाजारात चांगलीच उलथापालथ सुरू झाली आहे.

  • सोनं-चांदीच्या दराने उच्चांक गाठला आहे. चांदीच्या दराने रेकोर्डब्रेक दर गाठला अ

  • अवघ्या ३८ दिवसांत चांदीच्या दराने एक लाखाची उसळण घेतली

View All
advertisement