advertisement

Accident News : दिवाळी साजरी करायचं राहून गेलं! पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर, भिवंडीतील ह्रदयद्रावक घटना

Last Updated:

दिवाळी अवघ्या बोटावर मोजण्या इतक्या दिवसांवर आली आहे. असे असताना भिवंडीच्या पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कारण पाटील कुटुंबियातील एका तरूणाचा दुदैवी अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

News18
News18
Bhiwandi Accident News : नरेश पाटील, प्रतिनिधी भिवंडी : दिवाळी अवघ्या बोटावर मोजण्या इतक्या दिवसांवर आली आहे. असे असताना भिवंडीच्या पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कारण पाटील कुटुंबियातील एका तरूणाचा दुदैवी अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विनोद पाटील असे या (28) वर्षीय तरूणाचे नाव आहे. या घटनेने पाटील कुटुंबियावर शोककळा पसरली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, विनोद पाटील हा तरूण पडघा वरून भिवंडीच्या दिशेने दुचाकीने प्रवास करत होता. यावेळी निंबवली नाक्यावर त्याच्या दुचाकीला अपघात झाला होता.एका भरधाव कंटेनरने त्याला चिरडलं होतं.त्यामुळे या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला होता. खरं तर तो घरी जायला निघाला होता, पण त्याआधीच त्याला मृत्यूने गाठलं होतं.
advertisement
विनोद पाटील हा व्यवसायाने इंजिनिअर होता. तो मुळचा कर्नाटकचा रहिवासी होता. आणि कशेळी येथे नातेवाईकांकडे राहत होता. यावेळी विनोद पाटील येवईच्या रस्त्याने येत घरी येत असताना त्याचा मृत्यू झाला होता. एका भरधाव कंटेनरने त्याला चिरडल होतं त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला होता.या घटनेनंतर त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.
advertisement
या अपघातानंतर कंटनेर चालक फरार झाला आहे की पोलिसांनी त्याला पकडलं आहे?याची अद्याप काहीच माहिती मिळू शकलेली नाही आहे. पण या घटनेने परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.पण पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक कोंडी सोडवली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Accident News : दिवाळी साजरी करायचं राहून गेलं! पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर, भिवंडीतील ह्रदयद्रावक घटना
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement