‘बर्थडे’च्या नावाखाली टाईमपास महागात पडणार, कार्यालयात केक कापल्यास कारवाई!
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Birthday Celebration: सध्या वाढदिवस साजरा करण्याची सर्वत्रच क्रेझ आहे. परंतु, कार्यालयीन वेळेत वाढदिवस साजरा करणं सरकारी कर्मचाऱ्यांना महागात पडणार आहे.
छत्रपती संभाजीनगर: सध्या वाढदिवस साजरा करण्याची क्रेझ अगदी सरकारी कार्यालयात देखील दिसत आहे. परंतु, आता कार्यालयात केक कापून वाढदिवस साजरा करणं महागात पडणार आहे. ‘महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979’ बाबत शासनाचे परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यानुसार सरकारी कर्मचाऱ्याला नियमाचे उल्लंघन केल्यास थेट करावाईला सामोरे जावे लागणार आहे.
अनेक शासकीय कार्यायलांत कामाच्या संचिका तुंबलेल्या असतात. मात्र, काही अधिकारी आणि कर्मचारी शासकीय कार्यालयात वैयक्तिक समारंभ (वाढदिवस) साजरा करीत असल्याचे दिसते. हे निदर्शनास आल्यानंतर शासनाने परिपत्र काढून थेट कारवाईचा इशारा दिला.
काय आहे वर्तणूक नियम?
महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 नुसार कार्यालयात वैयक्तिक समारंभ करता येत नाहीत. शासकीय कार्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील वाढदिवस वा इतर खासगी समारंभ साजरा करता येत नाही. जर कोणत्याही अधिकारी वा कर्मचाऱ्याने कार्यालयीन वेळेत खासगी समारंभ, वाढदिवस साजरे केल्याचे निदर्शनास आल्यास थेट कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. याबाबत प्रशासनातील सर्व विभागांना परिपत्रक पाठवून सूचना करण्यात आल्या आहेत.
advertisement
दरम्यान, अलीकडच्या काळात सोशल मीडियावर मिरवण्यासाठी आणि चमकोगिरीसाठी अनेकजण पब्लिसिटी स्टंट करत आहेत. त्यात वाढदिवस साजरा करताना अनेकदा जबाबदारीचे देखील भान राहत नाही. त्यामुळे सराकरी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत ही चूक महागात पडणार आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Jul 04, 2025 12:29 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
‘बर्थडे’च्या नावाखाली टाईमपास महागात पडणार, कार्यालयात केक कापल्यास कारवाई!








