Nagpur : 'जास्त वळवळ कराल तर...', नागपुरात प्रचार सभेत भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

Last Updated:

Maharashtra Local Body Election : कळमेश्वर नगर परिषद निवडणूक प्रचार सभेत बोलताना भाजप नेते आशिष देशमुखांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जास्त वळवळ कराल तर कापून टाकू अशी धमकी देशमुखांनी विरोधकांना दिली आहे.

जास्त वळवळ कराल तर कापून फडकून टाकू, नागपुरात भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य...
जास्त वळवळ कराल तर कापून फडकून टाकू, नागपुरात भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य...
नागपूर: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. प्रचार सभेत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र, आता प्रचार सभेत वादग्रस्त वक्तव्य केल्याचे समोर आले. कळमेश्वर नगर परिषद निवडणूक प्रचार सभेत बोलताना भाजप नेते आशिष देशमुखांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जास्त वळवळ कराल तर अर्धा फडकून टाकू, अशी धमकी देशमुखांनी विरोधकांना दिली आहे. त्यांच्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.
विविध पक्षांचे नेते उमेदवारांच्या प्रचारासाठी गावोगावी फिरत आहेत. मात्र, तीव्र स्पर्धेत एकमेकांवर टीका करताना अनेकांची भाषा खालावत असल्याची घटना वारंवार समोर येत आहे. काही ठिकाणी मत न दिल्यास निधी मिळणार नाही अशा उघड धमक्या देण्यापर्यंतही काही नेते उतरले आहेत. तर, आता थेट फडकून टाकण्याची भाषा सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात चिंता व्यक्त केली जात आहे.
advertisement
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप आमदार आशिष देशमुख यांनी केलेल्या वक्तव्याने मोठा वाद निर्माण केला आहे. विरोधकांवर निशाणा साधताना म्हणाले की, “हे देवेंद्र फडणवीसांचे सरकार आहे. ते गृहमंत्री आहेत. ते नागपूरचे आहेत. त्यामुळे जास्त वळवळ कराल तर कापून काढू. देशमुखांनी विरोधकांना उद्देशून दिलेल्या या थेट धमकीने एकच खळबळ उडाली आहे. विशेषत: यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित होते.
advertisement

भाजपचा प्रचार करतो म्हणून झाली होती मारहाण...

काही दिवसांपूर्वीच भाजपचा प्रचार करतो का असा सवाल करत काँग्रेसच्या माजी नगरसेवकाने एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली होती. त्यावरून कळमेश्वरमधील वातावरण तापलं होतं.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nagpur : 'जास्त वळवळ कराल तर...', नागपुरात प्रचार सभेत भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
Next Article
advertisement
BMC Shiv Sena UBT: बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब्रँड शिलेदार
बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब
  • राजकीय संघर्षाचे केंद्र महापालिका सभागृहाकडे सरकले आहे.

  • ठाकरे गटाने विरोधी बाकावर बसण्याची तयारी केली असल्याचे चित्र आहे.

  • ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या गटनेते पदी आक्रमक चेहरा देण्यात आला आहे.

View All
advertisement