BMC Election Congress: मुंबईत वंचितनं १६ जागांवर गेम केला, काँग्रेस आता डाव पलटवणार! 'त्या' वॉर्डसाठी 'प्लान बी' आहे तरी काय?
- Reported by:susmita Bhadane patil
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
BMC Election Congress :वंचितकडून झालेल्या घोळामुळे काँग्रेसला फटका बसल्याची चर्चा होती. त्यातच वंचितने ५ जागांवर फ्रेंडली फाइट म्हणून उमेदवार उभे करत काँग्रेस आणि रासपची कोंडी केली.
मुंबई: मुंबई महापालिकेत वंचित बहुजन आघाडीसोबत काँग्रेसनं आघाडी केली. काँग्रेसने वंचितसाठी ६२ जागा सोडल्या. मात्र, वंचितने यातील २१ जागा उमेदवार नसल्याचे सांगत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याआधी काँग्रेसला परत केल्या. वंचितकडून झालेल्या घोळामुळे काँग्रेसला फटका बसल्याची चर्चा होती. त्यातच वंचितने ५ जागांवर फ्रेंडली फाइट म्हणून उमेदवार उभे करत काँग्रेस आणि रासपची कोंडी केली. आता निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत काँग्रेस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे.
काँग्रेस आणि वंचित सोबत जागावाटपावरून नाराज असलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आधी नाराज असलेल्या या 16 बंडखोर उमेदवारांवर आता पक्ष त्यांचाच मागे ठाम उभे राहण्याच्या भूमिकेत आहे. काँग्रेसने त्या १६ जागांवर आता आपल्या बंडखोरांना साथ देण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई महापालिका निवडणूकिसाठी वंचित सोबत काँग्रेसने युती केली. जागावाटप झालं आहे असं वाटत असताना वंचित आणि काँग्रेस मधील जागा वाटपाचा पेच समोर आला. ऐन उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी 16 जागा काँग्रेसला परत करण्यात आल्या आणि या 16 जागांवर काँग्रेसला उमेदवार देता आले नाही. यावरून काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका करण्यात आली होती.
advertisement
विशेषतः प्रभाग क्रमांक ६, ११, १२, १३, १४, १५, १९, २१, ३०, ४६, ११७, १५३, १७७, १८२, १९५ आणि १९८ या १६ प्रभागांमध्ये काँग्रेसला उमेदवार देता आले नाही. त्यामुळे या भागत काँग्रेस पक्षात बंडखोरी झाली. मात्र, या बंडखोरीकडे आता काँग्रेस पक्षाने सकारात्मक पद्धतीने पाहिले आहे. आता वंचितसोबतच्या आघाडीमुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली. त्यांनाच आता काँग्रेस पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत. या बंडखोरांमुळे काँग्रेस अप्रत्यक्षरीत्या पुन्हा मैदानात असणार असल्याचे म्हटले जात आहे.
advertisement
'वंचित'ने ऐनवेळी घातलेल्या गोंधळामुळे काँग्रेसने आपल्या बंडखोर उमेदवारांना आणि अपक्ष उमेदवारांना पाठिंबा द्यायचा निर्णय तर घेतला आहे. मात्र काही ठिकाणी मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांनाही पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 06, 2026 11:37 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election Congress: मुंबईत वंचितनं १६ जागांवर गेम केला, काँग्रेस आता डाव पलटवणार! 'त्या' वॉर्डसाठी 'प्लान बी' आहे तरी काय?







