BMC Election : बीएमसी निवडणुकीत उलथापालथ, वॉर्ड २२६ मध्ये गेम फिरला, नार्वेकरांना निवडणूक जड? मनसेने खेळ बिघडवला

Last Updated:

BMC Election : बिनविरोध निवडणूक करण्यासाठी विरोधकांवर दबाव टाकल्याच्या आरोपाने दक्षिण मुंबईतील वॉर्ड क्रमांक २२६ मधील निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे.

बीएमसी निवडणुकीत उलथापालथ,, वॉर्ड २२६ मध्ये गेम फिरला, नार्वेकरांना निवडणूक जड?  मनसेने खेळ बिघडवला
बीएमसी निवडणुकीत उलथापालथ,, वॉर्ड २२६ मध्ये गेम फिरला, नार्वेकरांना निवडणूक जड? मनसेने खेळ बिघडवला
संकेत वरक, प्रतिनिधी, मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी चांगलीच उलथापालथ झाली आहे. बिनविरोध निवडणूक करण्यासाठी विरोधकांवर दबाव टाकल्याच्या आरोपाने दक्षिण मुंबईतील वॉर्ड क्रमांक २२६ मधील निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू आणि भाजपचे मकरंद नार्वेकर हे या वॉर्डमधील उमेदवार आहेत. या वॉर्डमधील राजकीय समीकरणे चांगलीच बदलली असून मनसेच्या एका डावाने सगळा खेळ बिघडला आहे.
मुंबईतील प्रभाग क्रमांक २२६ मध्ये एक अत्यंत दुर्मिळ आणि धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे. भाजपचे उमेदवार मकरंद नार्वेकर यांना रोखण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांनी सर्व मतभेद विसरून एका अपक्ष उमेदवाराला ताकद दिली आहे. अपक्ष उमेदवार तेजल पवार यांच्या पाठीशी मनसे, ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि वंचित बहुजन आघाडी असे सर्वच पक्ष उभे ठाकल्याने या प्रभागात हायव्होल्टेज ड्रामा सुरू झाला आहे. तेजल पवार यांना मनसेने पुरस्कृत केले असून शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे.
advertisement

> प्रचार रथावर राज, उद्धव अन् राहुल गांधी!

तेजल पवार यांच्या प्रचार रथावर राज ठाकरे, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, शरद पवार, सोनिया गांधी, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या सर्व नेत्यांचे फोटो झळकत आहेत. एका अपक्ष उमेदवाराच्या प्रचारासाठी बॅनरवर सगळे नेते एकत्र आल्याने मतदारांच्या भुवया उंचावल्या आहेत.

> पत्राद्वारे अधिकृत पाठिंबा

advertisement
मनसेने तेजल पवार यांना पुरस्कृत केले आहे. तर शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस यांनी तेजल पवार यांना पाठिंबा देत असल्याचे अधिकृत पत्रही दिले आहे. प्रभाग २२६ मध्ये भाजपची ताकद मोठी असल्याने त्यांना शह देण्यासाठी असे समीकरण आखण्यात आले आहे.

> नार्वेकर विरुद्ध पवारांमध्ये थेट लढत

प्रभाग २२६ मध्ये भाजपचे मकरंद नार्वेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांनी आपापले उमेदवार न देता तेजल पवार यांना बळ दिल्याने ही लढत आता चुरशीची झाली आहे. महायुतीला रोखण्यासाठी महाविकास आघाडीसह मनसे आणि वंचितनेही अप्रत्यक्षपणे हातमिळवणी केल्याचे दिसून आले.
advertisement

> भाजप विरोधात दुसरा अपक्ष रिंगणात...

भाजप उमेदवार मकरंद नार्वेकर यांच्या विरोधात फक्त तेजल पवार यांचा अर्ज वैध ठरला आहे. तर, इतरांचे अर्ज अवैध अथवा फेटाळण्यात आल्याने एकच गदारोळ झाला आणि आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडल्या. तर, वॉर्ड क्रमांक १०७ मध्ये भाजप उमेदवार नील सोमय्या यांच्याविरोधात अपक्ष दिनेश जाधव यांना ठाकरे गट आणि इतरांनी पाठिंबा दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election : बीएमसी निवडणुकीत उलथापालथ, वॉर्ड २२६ मध्ये गेम फिरला, नार्वेकरांना निवडणूक जड? मनसेने खेळ बिघडवला
Next Article
advertisement
BMC Election : बीएमसी निवडणुकीत उलथापालथ, वॉर्ड २२६ मध्ये गेम फिरला, नार्वेकरांना निवडणूक जड?  मनसेने खेळ बिघडवला
BMCमध्ये उलथापालथ,,वॉर्ड २२६ मध्ये मनसेने गेम फिरवला, नार्वेकरांना निवडणूक जड?
  • मुंबई महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी चांगलीच उलथापालथ झाली आहे.

  • वॉर्ड क्रमांक २२६ मधील निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे.

  • राजकीय समीकरणे चांगलीच बदलली असून मनसेच्या एका डावाने सगळा खेळ बिघडला आहे.

View All
advertisement