Buldhana News: प्रियकर फोन उचलेना, थेट गाठले घर; डॉक्टर तरुणीला मारहाण, धींड काढण्याचा प्रयत्न
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
प्रियकर फोन उचलत नसल्याने थेट तरुणीने त्याचे घर गाठले. प्रियकराच्या घरी येऊन घरच्यांना त्याबद्दल विचारले.
राहुल खंडारे, बुलढाणा, 11 ऑगस्ट : बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा तालुक्यात बारलिंगा इथं एका डॉक्टर तरुणीला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणीची धिंड काढण्याचा प्रयत्नही करण्यात आला. पण काही ग्रामस्थांनी तरुणीला अंधेरा पोलीस स्टेशनला पोहोचवले. तरुणीने अंधेरा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात जबर मारहाण आणि विनयभंगाची तक्रार दिली. पण अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.
अमरावती जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉक्टर तरुणी बारलिंगा गावात आली होती. पीडित तरुणी चे सिंदखेड राजा तालुक्यातील बारलिंगा येथील एका तरुणासोबत प्रेमसंबंध आहेत. मात्र प्रियकर फोन उचलत नसल्याने थेट तरुणीने त्याचे घर गाठले. प्रियकराच्या घरी येऊन घरच्यांना त्याबद्दल विचारले. यावेळी प्रियकराच्या घरच्यांसोबत तिचा वादही झाला. तेव्हा प्रियकराच्या घरच्या लोकांनी तिला अश्लील शिवीगाळ करत जबर मारहाण केली.
advertisement
याप्रकरणी तरुणीने पोलिसात तिघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. मारहाण करत विनयभंगाचा प्रयत्न केल्याचा आरोप तरुणीने तरुणासह त्याच्या कुटुंबियांवर केला आहे. आरोपींची नावे गणेश जायभाये, लता जायभये, बद्रिनाथ जायभाये अशी आहेत. तरुणीने तक्रार दाखल केली असून आता पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तसंच आरोपींचा शोध घेतला जात आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 11, 2023 12:31 PM IST
मराठी बातम्या/बुलढाणा/
Buldhana News: प्रियकर फोन उचलेना, थेट गाठले घर; डॉक्टर तरुणीला मारहाण, धींड काढण्याचा प्रयत्न


