Buldhana News : कोयता अन् देशी कट्टा घेऊन शेतकऱ्याची बाजार समितीत घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?

Last Updated:

Buldhana News : सोयाबीनला भाव मिळत नसल्याने एका शेतकऱ्याने संतप्त होत बाजार समितीत घोषणाबाजी केली.

संतप्त शेतकरी
संतप्त शेतकरी
बुलढाणा, (राहुल खंडारे, प्रतिनिधी) : सध्या राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण सोयाबीनच्या दरात कमालीची घसरण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मिळालेल्या दरात शेतकऱ्यांना नफा तर सोडा पण त्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. याच नैराश्यातून खामगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर एका शेतकऱ्याने हातात कोयता व देशी कट्टा सदृश्य वस्तू हातात घेऊन निदर्शने केली.
शेतकऱ्याचा उद्रेक
पावसाच्या लहरीपणाचा फटका यंदा सोयाबीन पिकाला सर्वाधिक बसला. त्यातच पीक ऐन भरात असताना येलो मोझॅकचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. किमान भाव तरी समाधानकारक मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, पाच हजारांचा पल्लाही गाठत नसल्यामुळे लागवडही वसूल होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. किमान सहा हजार रुपये तरी भाव मिळावा, अशी अपेक्षा आहे. सोयाबीनला भाव मिळत नसल्याने खामगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर एका शेतकऱ्याने हातात कोयता व देशी कट्टा सदृश्य वस्तू हातात घेऊन निदर्शने केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. 6 हजार रुपये सोयाबीनला भाव द्या, अश्या घोषणा देत त्या शेतकऱ्याने APMC समोर तांडव केला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून शेतकऱ्याच्या या कृत्याने खळबळ माजली आहे.
advertisement
तेल आणि सोयाबीन ढेप आयात, दरांवर परिणाम
मागच्या वर्षी सोयाबीनला 6 हजार रुपये क्विंटलपर्यंतचा भाव होता. यावर्षी सुरुवातीलाच 3800 रुपये क्विंटलचा भाव मिळत होता. यामुळे सोयाबीनची सोंगणी करायची की नाही, असा प्रश्नही शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. केंद्र शासनाने सोयाबीन तेल आणि डीओसी आयात करण्याचे धोरण जाहीर केले आहे. तेल आणि सोयाबीन ढेप आयात होत असल्याने बाजारात सोयाबीनचे दर पडले आहेत. पुढील काळात हे दर काय असतील हे सांगणे सध्या तरी अवघड आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Buldhana News : कोयता अन् देशी कट्टा घेऊन शेतकऱ्याची बाजार समितीत घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement