Agniveer Gawate Akshay : राज्यातील पहिल्या अग्निवीराला जम्मूमध्ये वीरणरण; मृत्यूचं कारण आलं समोर
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Agniveer Gawate Akshay : बुलढाणा जिल्ह्यातील अक्षय गवते या अग्निवीराला जम्मू काश्मीर येथे वीरमरण आलं आहे.
बुलढाणा, 22 ऑक्टोबर (राहुल खंडारे, प्रतिनिधी) : काही दिवसांपूर्वी अग्निवीर अमृतपाल सिंग यांच्या मृत्यूनंतर त्यांना लष्कराकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला नव्हता. यावरुन वाद निर्माण झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता राज्यातील पहिल्या अग्निवीर जवानाचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाला आहे. अक्षय लक्ष्मण गवते (वय 23 वर्षे) असं मृत्यू झालेल्या जवानाचं नाव आहे.
अग्निवीर जवान अक्षय लक्ष्मण गवते हा बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई गावचा सुपूत्र होते. अक्षय गवते जम्मूमधील सियाचीन येथे कर्तव्यावर असताना त्यांना श्वसनाच्या त्रासामुळे वीरमरण प्राप्त झाले आहे. अक्षय गवते हे मागील वर्षी 30 डिसेंबर 2022 रोजी अग्णिवीर म्हणून भारतीय सैन्यात भरती झाले होते. जवान हे शेतकरी कुटुंबातील एकुलता एक मुलगा असून त्यांच्या वीर मरणाने पिंपळगाव सराई परिसरात शोककळा पसरली आहे. उद्या या अग्निवीर अक्षय गवते यांच्या मृतदेहावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत. त्यांचा मृतदेह जम्मू येथून नुकताच संभाजीनगर येथे दाखल झाला आहे.
advertisement
अग्निवीर अमृतपाल सिंह की मौत के बाद सेना की ओर से उन्हें गार्ड ऑफ ऑनर नहीं दिया गया यानी की अमृतपाल को सैन्य अंतिम संस्कार नहीं मिला. मृतक अग्निवीर पंजाब के मानसा जिले के गांव कोटली के रहने वाले थे. उनके पिता ने इसे लेकर सवाल उठाए हैं, जिस पर अब विवाद शुरू हो गया है और राजनीति भी तेज हो गई है. पंजाब में विपक्षी दलों ने सैन्य अंतिम संस्कार नहीं देने पर हैरानी जताई है. वहीं सेना के अनुसार हर साल करीब 140 मामले ऐसे हो रहे हैं. जब हर साल होने वाले ऐसे मामले में सेना की ओर से मृतक सैनिक को ऑफ ऑनर नहीं दिया गया, तो अग्निवीर अमृतपाल की मौत पर विवाद क्यों हो रहा है.
advertisement
वाचा - रेल्वे तिकीटासोबत मिळतात 'या' सुविधा, Indian Railway संदर्भात फार कमी लोकांना ठावूक असेल ही गोष्ट
अग्निवीर अमृतपाल सिंग यांच्या मृत्यूवरुन झाला होता वाद
अग्निवीर अमृतपाल सिंग यांच्या मृत्यूनंतर त्यांना लष्कराकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला नाही, म्हणजेच अमृतपाल यांच्यावर लष्करी अंत्यसंस्कार झाले नाहीत. मृत अग्निवीर हा पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील कोटली गावचा रहिवासी होता. याबाबत त्यांच्या वडिलांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरून बरच राजकारण तापलं होतं. पंजाबमधील विरोधी पक्षांनी लष्करी अंत्यसंस्कार न केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. लष्कराच्या म्हणण्यानुसार दरवर्षी अशी सुमारे 140 प्रकरणे घडत आहेत.
advertisement
अमृतपाल सिंग सैन्यात कधी रुजू झाले?
19 वर्षीय अमृतपाल सिंग डिसेंबर 2022 मध्ये अग्निपथ योजनेंतर्गत लष्करात अग्निवीर बनला आणि जम्मू-काश्मीरमध्ये तैनात झाला. 11 ऑक्टोबर 2023 रोजी तो एका फॉरवर्ड पोस्टवर मृतावस्थेत आढळला. लष्कराने ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर आणि इतर चार सैनिकांसह त्याचा मृतदेह त्याच्या घरी पाठवला, परंतु लष्कराने मृत अग्निवीरवर लष्करी अंत्यसंस्कार केले नाहीत.
advertisement
गार्ड ऑफ ऑनर का दिला नाही?
view commentsभारतीय लष्कराने या संदर्भात सोशल मीडिया X वर एक निवेदन जारी केले, त्यानुसार अमृतपाल सिंह यांचा मृत्यू स्वत:ला लागलेल्या गोळीमुळे झाला. मयत अग्निवीर याने आत्महत्या केली असून स्वत:ला झालेली इजा हे मृत्यूचे कारण आहे. त्यामुळे नियमानुसार गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलेला नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी केली जात असल्याचेही लष्कराने म्हटले आहे.
Location :
Buldana,Maharashtra
First Published :
October 22, 2023 9:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Agniveer Gawate Akshay : राज्यातील पहिल्या अग्निवीराला जम्मूमध्ये वीरणरण; मृत्यूचं कारण आलं समोर


