रेल्वे तिकीटासोबत मिळतात 'या' सुविधा, Indian Railway संदर्भात फार कमी लोकांना ठावूक असेल ही गोष्ट

Last Updated:

तुम्हाला माहितीय का की तुम्ही काढलेलं हे तिकीट तुम्हाला फक्त ट्रेनमध्ये बसण्याचा अधिकार देत नाही, तर या तिकीटामुळे तुम्ही आणखी काही गोष्टींचा आणि सेवांचा देखील लाभ देखील घेऊ शकता

प्रतिकात्मत फोटो
प्रतिकात्मत फोटो
मुंबई, 22 ऑक्टोबर : ट्रेनचा प्रवास हा कमी खर्चिक आणि सर्वांच्याच खिशाला परवडणारा असतो, म्हणूनच बहुतांश लोक ट्रेननेच लांबचा प्रवास करतात. ट्रेनने प्रवास करण्यासाठी आपल्याला तिकिट काढावी लागते हे तर आपल्या सर्वांना ठावूक आहे. तसेच लांबच्या प्रवासासाठी रेल्वेचं रिजर्वेशन तिकीट घ्यावं लागतं ज्यामुळे लोकांना आरामदायी प्रवास करता येतो.
पण याच तिकीटाबद्दल आज आम्ही अशी गोष्ट सांगणार आहे, ज्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल.
तुम्हाला माहितीय का की तुम्ही काढलेलं हे तिकीट तुम्हाला फक्त ट्रेनमध्ये बसण्याचा अधिकार देत नाही, तर या तिकीटामुळे तुम्ही आणखी काही गोष्टींचा आणि सेवांचा देखील लाभ देखील घेऊ शकता. चला याबद्दल जाणून घेऊ
विमा
तिकीटासोबत ट्रॅवल विमा मिळतो. जर तुम्ही तिकीट बुक करताना विमा घेतला तर तुम्हाला अनेक प्रकारच्या सुविधा मिळतात. रेल्वे प्रवास विमा अंतर्गत, ट्रेनने प्रवास करताना तुमचा मृत्यू किंवा तात्पुरते अपंगत्व आल्यास 10 लाख रुपये तुम्हाला मिळू शकतात.
advertisement
हा विमा रेल्वे अपघात किंवा प्रवासादरम्यान तत्सम परिस्थितीच्या बाबतीत खूप उपयुक्त आहे. कायमस्वरूपी आंशिक अपंगत्व असल्यास, विम्याचे संरक्षण 7.5 लाख रुपयांपर्यंत आहे. तसेच या काळात रुग्णालयात दाखल आणि उपचारांसाठी 2 लाख रुपयांपर्यंत विमा उपलब्ध आहे.
ही रक्कम मृत्यू आणि अपंगत्व कव्हरेजपेक्षा जास्त आहे. या विमा अंतर्गत रेल्वे अपघात, चोरी, डकैती किंवा अशा कोणत्याही परिस्थितीसाठी कव्हरेज उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला तिकिटापेक्षा जास्तीचे फक्त 49 पैसे खर्च करावे लागतील. ही रक्कम खूपच कमी आहे.
advertisement
वायफाय
जर तुम्ही ट्रेनची वाट पाहत स्टेशनवर बसला असाल तर तुम्ही मोफत वायफायचा आनंद घेऊ शकता. आता ही सुविधा बहुतेक रेल्वे स्थानकांवर उपलब्ध आहे.
प्रथमोपचार पेटी
जेव्हा तुम्ही ट्रेनमध्ये जाता आणि तुम्हाला प्रवासादरम्यान औषध इत्यादींची आवश्यकता असते, तेव्हा तुम्ही TTE कडून त्याची मागणी करू शकता. प्रत्येक प्रवाशाला रेल्वेने ही सुविधा दिली आहे.
advertisement
वेटिंग रूम
जर तुमच्याकडे तिकीट असेल तर तुम्ही तुमच्या तिकिटाच्या वर्गानुसार वेटिंग रूममध्ये सहज आराम करू शकता. यासाठी तुम्हाला रेल्वेने सुविधा दिली आहे आणि ट्रेन येईपर्यंत तुम्ही इथे बसू शकता.
क्लोक रूमची सुविधा
ज्या लोकांकडे ट्रेनची तिकिटे आहेत ते स्टेशनवरील क्लोक रूम वापरू शकतात आणि त्यांचे सामान जमा करू शकतात.
view comments
मराठी बातम्या/Viral/
रेल्वे तिकीटासोबत मिळतात 'या' सुविधा, Indian Railway संदर्भात फार कमी लोकांना ठावूक असेल ही गोष्ट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement