मराठी लोक लय हाणतात, गुजराती-मारवाडी चांगले; गजानन महाराजांच्या वेशातील बाबा काय म्हणाला?
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
गजानन महाराजांच्या वेशात फिरणाऱ्या बाबाने आपण आनंदसागरला असून तिथे माझी गादी आहे. मराठी लोक मानत नाहीत पण मारवाडी मानतात, मला सांभाळतात असं म्हटलंय.
मुंबई, 05 ऑक्टोबर : बुलढाण्यामध्ये मागील चार दिवसांपासून गजानन महाराजांच्या वेशात एक बाबा फिरत आहे. गजानन महाराजांच्या वेषात आलेल्या या बाबाला पाहून लोकांनी मोठी गर्दीही केली होती. दरम्यान, या बाबाला काही लोकांनी मारहाण केल्याची घटनाही घडली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आता या प्रकारानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना या बाबाने आपण आनंदसागरला असून तिथे माझी गादी आहे. मराठी लोक मानत नाहीत पण मारवाडी मानतात, मला सांभाळतात असं म्हटलंय.
मारहाणीच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना बाबाने म्हटलं की, लय हाणत्यात मला मराठी लोकं, रजपूत, मारवाडी, गुजराती या लोकांनी सांभाळलं. मराठी माणसांनी लय हाणलं. एकाने चापट मारली, का मारली माहिती नाही.
नाव, गाव, पत्ता याबद्दल माहिती विचारली असता गजानन बाबांच्या वेशात फिरणाऱ्या बाबाने सांगितलं की, आमचं गाव शेगाव आहे. आनंदसागरला असतो आम्ही. आनंदसागरला आमची गादी आहे. तिथं मारवाडी लोकं मानतात. पाटील, मराठी लोकं मानत नाहीत. ग्यानबा तुकाराम म्हणतात. मराठी लोकांनी उसाने हाणलं हो गजानन बाबाला, मेल्यावर त्याच्या नावावर खात्यात. अशी ही लोकं आहेत. पण मारवाडी लोकांनी मला सांभाळलं.
advertisement
स्वत:बद्दल सांगताना बाबाबाने म्हटलं की, मला उकारड्यात टाकलं होतं. आनंद सागरमधील ब्राह्मणांनी सांभाळलं. प्रकट दिनाला लोक बोलावतात, मी तिथे गेल्यावर लोक पैसे कमावतात. गणपत गजानन कुलकर्णी. माझं नाव गणपत, सांभाळणाऱ्याचं गजानन असंही बाबाने म्हटलं. आपल्याला आमदार खासदार भेटून गेल्याचंही सांगितलं.
लातूर जिल्ह्यातील घुग्गी येथील शेषराव रामराव बिराजदार नामक व्यक्तीचे बँक पासबुक देखील सापडले आहे. या पासबुकाबाबत विचारले असता बाबाने असं सांगितलं की, ते माझं नाहीय. मला ते सापडलं असंच. ज्याचं आहे त्याला द्यायचं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 05, 2023 2:56 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
मराठी लोक लय हाणतात, गुजराती-मारवाडी चांगले; गजानन महाराजांच्या वेशातील बाबा काय म्हणाला?


