Raju Shetti-Ravikant Tupkar : तुपकर-शेट्टी वाद मिटणार का? स्वाभीमानीच्या शिस्तपालन समितीने पुण्यात घेतला मोठा निर्णय

Last Updated:

Raju Shetti-Ravikant Tupkar : स्वाभीमानी शेतकरी संघटनेत अंतर्गत वाद निर्माण झाल्याने पुणे येथे बैठक बोलावण्यात आली आहे.

तुपकर-शेट्टी वाद मिटणार का?
तुपकर-शेट्टी वाद मिटणार का?
राहुल खंडारे, प्रतिनिधी
बुलडाणा, 8 ऑगस्ट 2023 : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंतर आणखी एक संघटना फुटण्याच्या वाटेवर असल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांसाठी काम करणारी संघटना अशी ओळख असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मागच्या काही दिवसांपासून कुरबुर असल्याची चर्चा आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर मागच्या काही दिवसांपासून नाराज आहेत. त्यांनी उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे. अशातच संघटनेतील या बाबींवर चर्चा करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुण्यात बैठक बोलावली आहे. स्वाभिमानीची पुण्यातील शिस्तपालन बैठक संपली असून लवकरच निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.
advertisement
स्वाभिमानीची शिस्तपालन समिती निर्णय जाहीर करणार
पक्षात अंतर्गत कलह निर्माण झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेन्या शिस्तपालन समितीने पुण्यात बैठक बोलावली होती. थोड्याच वेळात शिस्त पालन समिती निर्णय करणार जाहीर करण्याची शक्यता आहे. रविकांत तुपकर आणि राजू शेट्टी वादावर समिती आपला निर्णय जाहीर करणार आहे. तुपकरांना आणखी एक वेळ संधी दिली जाईल अशी सूत्रांची माहिती आहे. तुपकरांना आपलं मत शिस्त पालन समितीकडे मांडावे. समितीकडून अजूनही टोकाची भूमिका घेतल्या जाणार नाही. राजू शेट्टी आणि तुपकर वाद मिटविण्यासाठी आणखी एक संधी देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
advertisement
राजू शेट्टी यांचा भाजपवर आरोप
पक्ष आणि संघटना फोडण्याचं भाजपचं अधिकृत काम आहे. मागच्या काही दिवसांपासून आपल्याला राज्यात ते दिसत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत जे घडतंय यामागे सुद्धा भाजप असल्याचा संशय आहे, असं राजू शेट्टी म्हणालेत. भाजपकडून ऑफर दिली जाते, निश्चितच संशयाला जागा आहे. याआधी शिवसेना, राष्ट्रवादी आणि याआधीही शेतकरी संघटनेत जे झालं आहे. त्यामुळे आताही जे घडतंय. त्यामागे भाजप असण्याची शक्यता आहे, असं राजू शेट्टी म्हणालेत. आजच्या बैठकीला रविकांत तुपकर यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. बैठकीसमोर येऊन तुपकरांनी आपलं म्हणणं मांडावं, असंही ते म्हणालेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Raju Shetti-Ravikant Tupkar : तुपकर-शेट्टी वाद मिटणार का? स्वाभीमानीच्या शिस्तपालन समितीने पुण्यात घेतला मोठा निर्णय
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement