advertisement

Political News : अनिल परबांनी सोमय्यांविरोधात थोपटले दंड; घेतला मोठा निर्णय

Last Updated:

मोठी बातमी समोर येत आहे. साई रिसॉर्ट संदर्भात सोमय्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

News18
News18
मुंबई, 8 ऑगस्ट : मोठी बातमी समोर येत आहे. साई रिसॉर्ट संदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी या प्रकरणाची तक्रार लोकायुक्तांकडे देखील केली होती. मात्र या प्रकरणात आता सोमय्या यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात लोकायुक्तांनी निर्णय दिल्यानंतर आता अनिल परब हे पुन्हा एकाद कोर्टात जाणार आहेत.
 नेमकं काय म्हणाले परब? 
साई रिसॉर्ट प्रकरणात गेल्या काही वर्षांपासून किरीट सोमय्या हे माझ्यावर आरोप करत आहेत. त्यांनी या प्रकरणात लोकायुक्तांकडे देखील तक्रार केली होती. मात्र त्यांची याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. सोमय्या तोंडावर पडले आहेत. या प्रकरणात माझी नाहक बदनामी करण्यात आली. लोकायुक्तांचा निर्णय आला आहे.
हे रिसॉर्ट माझं नाहीये, तर ते सदानंद परब यांचं आहे. मी ते आधीच विकलं होतं. मी त्या दिवसापासून सांगत आलोय की, माझा त्या रिसॉर्टशी काही संबंध नाही. मी सोमय्यांवर 100 कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. नाक घासावं अन्यथा 100 कोटी रुपये द्यावेत.   माझ्यावर जे आरोप करण्यात आले ते राजकीयदृष्ट्या केले गेले. वेगवेगळ्या संघटनांनी चौकशी केली आहे, त्यामुळे आम्हाला वेगळी चौकशी करण्याची गरज नसल्याचं लोकायुक्तांनी म्हटलं आहे. माझ्या कुटुंबाला मानसीक त्रास झाला त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करतानाच आपण पुन्हा एकदा न्यायालयात जाणार असल्याचं परब यांनी म्हटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Political News : अनिल परबांनी सोमय्यांविरोधात थोपटले दंड; घेतला मोठा निर्णय
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement