Buldhana : ती चौदाची, तो 22 वर्षांचा; प्रेम म्हणजे काय? कळायच्या आधीच उचललं टोकाचं पाऊल
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
सूतगिरणीच्या परिसरात एका झाडाला दोघांचे मृतदेह लटकलेले होते. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.
राहुल खंडारे, बुलढाणा, 23 डिसेंबर : सिंदखेडराजा तालुक्यातील शेंदुर्जन इथं २२ वर्षीय तरुणासह १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने सोबतच गळफास घेत जीवन संपवल्याने खळबळ उडाली आहे. साखरखेडा गावाजवळ असलेल्या सूतगिरणीच्या परिसरात दोघांचेही मृतदेह एकाच झाडाच्या फांदीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. गेल्या चार दिवसांपासून दोघेही गावातून बेपत्ता होते अशी माहिती समोर येतेय.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, साखरखेर्डा इथल्या २२ वर्षीय गोपाल खिल्लारे याचं गावातीलच एका १४ वर्षांच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. दोघेही चार दिवसांपासून बेपत्ता होते. मुलीच्या आईने मुलगी बेपत्ता असल्याची तक्रारही पोलिसात दिली होती. दरम्यान, दोघांचेही मृतदेह शेंदुर्जन इथं गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
advertisement
सूतगिरणीच्या परिसरात एका झाडाला दोघांचे मृतदेह लटकलेले होते. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव गोपाल खइल्लारे असं आहे. दोघेही शेंदुर्जन इथं राहत होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 23, 2023 10:42 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Buldhana : ती चौदाची, तो 22 वर्षांचा; प्रेम म्हणजे काय? कळायच्या आधीच उचललं टोकाचं पाऊल









