सासरवाडीत मुक्कामाला गेला जावई, दारात पार्क केली फॉर्च्युनर; सकाळी बसला मोठा धक्का
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
गाडी शोधण्यासाठी सीसीटीव्ही फूटेज तपासल्यानंतर एका महिलेने गाडी चोरल्याचं समोर आलं. महिला तिच्यासोबत लॅपटॉप घेऊन आली होती.
गोरखपूर, 23 डिसेंबर : उत्तर प्रदेशात गोरखपूरमध्ये एक जावई त्याच्या नव्या कोऱ्या फॉर्च्युनर कारमधून बायकोच्या माहेरी गेला होता. रात्री मुक्कामाला गेलेल्या जावयाने कार दारात उभा केली होती. सकाळी उजाडल्यानंतर जेव्हा दारात पाहिलं तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केल्यानंतर सर्व प्रकार उघड झाला. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
गोरखपूरच्या रामगढ ताल परिसरात विवेकपुर इथं ही घटना घडली. लखनऊत राहणारे हिमांशु सिंह यांची गाडी चार दिवसांपूर्वी चोरीला गेली. १७ डिसेंबरला ते सासरवाडीत पोहोचले होते. त्यावेळी दारात गेटजवळ फॉर्च्युनर गाडी लावली होती. पण सकाळी उठून पाहिलं तर दारात गाडी नव्हती.
advertisement
गाडी शोधण्यासाठी सीसीटीव्ही फूटेज तपासल्यानंतर एका महिलेने गाडी चोरल्याचं समोर आलं. महिला तिच्यासोबत लॅपटॉप घेऊन आली होती. तिने ट्रॅक सूट आणि मास्क घातलेला. कोणत्यातरी डिव्हाइसचा वापर करून सहज गाडीचं लॉक तोडलं आणि गाडीत बसून ८ मिनिटात निघून गेली. या घटनेवेळी सीसीटीव्हीत आणखी एक महिलासुद्धा दिसते. पोलिसांना संशय आहे की ती आरोपीची सहकारी आहे.
advertisement
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या कृष्ण कुमार विश्नोई यांनी म्हटलं की, स्मार्ट डिव्हाइस वापरून गाडी चोरी केली आहे. यात जुनी चावी डिसेबल करून नव्या चावीच्या मदतीने गाडीचं लॉक उघडून चोरी केली जाते. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे चौकशी सुरू आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 23, 2023 10:05 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
सासरवाडीत मुक्कामाला गेला जावई, दारात पार्क केली फॉर्च्युनर; सकाळी बसला मोठा धक्का


