Buldhana News : दोन महिलांनी 'त्याला' जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून चपलेने धुतला; बुलढाण्यातील Video व्हायरल
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Buldhana News : बुलढाण्याचा एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओत दोन महिला एका पुरुषाला चपलेने मारहाण करताना दिसत आहेत.
बुलढाणा, 4 ऑक्टोबर (राहुल खंडारे, प्रतिनिधी) : बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात आज महिलांचे रौद्ररुप पाहायला मिळाले. ग्रामपंचायत सदस्यांविरोधात तक्रार करुन नंतर प्रकरण मिटवण्यासाठी पैसे घेणाऱ्या एका व्यक्तीला थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन चोप दिला आहे. संबंधित व्यक्तीने धमकावून अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप महिलांनी केला आहे. मेहकर तालुक्यातील भालेगाव येथील महिला उपसरपंच आणि सदस्यानी या व्यक्तीला मारहाण केली. तर संतोष चांदणे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
काय आहे प्रकरण?
संतोष चांदणे याने भालेगावसह तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत सदस्यांविरोधात अतिक्रमण केल्याची तक्रार केली आबे. तो ही प्रकरणे आपसात मिटवण्यासाठी पैसे उकळतो असा आरोप आहे. त्याने भालेगावचे महिला उपसरपंच मंगला निकम आणि अनिता काळे यांच्यासोबतही असंच काहीसं केलं. संतोष चांदणे याने दोन्ही महिलांकडे 1 लाख रुपयांची मागणी, तसेच अश्लील शिवीगाळही केल्याचा आरोप आहे.
advertisement
बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात दोन महिलांकडून एकाची धुलाई, काय आहे प्रकरण? pic.twitter.com/IbB5dgkaUg
— News18Lokmat (@News18lokmat) October 4, 2023
मंगला निकम आणि अनिता काळे यांची संतोष चांदणे याने जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार केलीय. ही तक्रार मागे घेण्यासाठी त्याने महिलांकडे 1 लाखांची मागणी केली. तसेच महिला पैसे देण्यास तयार न झाल्याने त्याने महिलांना शिवीगाळ केली. त्यामुळे महिलांना राग अनावर झाला. यावेळी निकम आणि काळे या महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन संतोष चांदणे याची चपलेने धुलाई केली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
advertisement
संबंधित प्रकरणी आता प्रशासनाकडून काही कारवाई करण्यात येते का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. संबंधित व्यक्तीकडून अशाप्रकारे किती जणांना फसवण्यात आलं किंवा त्या व्यक्तीवर तशे फक्त आरोप करण्यात आले आहेत का? याचा खुलासा आता प्रशासनाकडून केला जातो का? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
view commentsLocation :
Buldana,Maharashtra
First Published :
October 04, 2023 9:51 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Buldhana News : दोन महिलांनी 'त्याला' जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून चपलेने धुतला; बुलढाण्यातील Video व्हायरल


