advertisement

मी सूट देतो पण टाय, अंडरपँट तरी राज्य सरकारकडून घ्या; गडकरींनी आमदार खासदारांना सुनावले

Last Updated:

राज्य सरकारच्या अखत्यारित असलेली कामेही आमदार, खासदार घेऊन येत असल्याने नितीन गडकरींनी सुनावलं. नितीन गडकरींच्या फटकेबाजीमुळे सभास्थळी हशा पिकला होता.

News18
News18
राहुल खंडारे, बुलडाणा, 18 ऑगस्ट : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील नांदुरा ते शेलाद या महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामाचं उद्घाटन आज झालं. यावेळी उपस्थित आमदार खासदारांना नितीन गडकरी यांनी मिश्किल टोला लगावला. राज्य सरकारच्या अखत्यारित असलेली कामेही आमदार, खासदार घेऊन येत असल्याने नितीन गडकरींनी सुनावलं. नितीन गडकरींच्या फटकेबाजीमुळे सभास्थळी हशा पिकला होता.
नितीन गडकरी यांनी बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्ग उभारले आहेत. त्यामुळे जे विषय राज्य सरकारकडे आहे ते विषय घेऊन आमदार, खासदार नितीन गडकरी यांच्याकडे जात आहे. यावर उपस्थित आमदार खासदारांना मिश्किल टोला लगावत नितीन गडकरी यांनी चांगलंच सुनावल आहे. जे विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत आहेत ते विषय घेऊन माझ्याकडे येऊ नका.. मी तुम्हाला सूट शिवून देऊ शकतो. किमान टाय आणि अंडरपॅन्ट, बनियन तरी तुम्ही राज्य सरकारकडून मिळवा असा टोला नितीन गडकरी यांनी लगावला.
advertisement
महिला बचत गटांना ड्रोन दिले जातील आणि युरिया ड्रोनने फवारा असंही गडकरी म्हणाले. महामार्गाचे काम पूर्ण नसताना उद्घाटन केलं जात असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. यावरही गडकरींनी त्यांच्या भाषणातून उत्तर दिलं. ते म्हणाले की, रस्त्याचं काम ९७ टक्के पूर्ण झालं आहे. आता जे ३ टक्के काम अपुरं राहिलं आहे ते पावसामुळे राहिलं आहे. महामार्गामुळे शेगाव आणि लोणारला कनेक्टिव्हीटी मिळेल. शिवाय 5 पट राष्ट्रीय मार्ग वाढवले आहेत. फॉरेस्ट चे क्लिअरन्स झाले नाही. मी खूप प्रयत्न केले मात्र फॉरेस्टचे क्लिअरन्स मिळाले नाही.
view comments
मराठी बातम्या/बुलढाणा/
मी सूट देतो पण टाय, अंडरपँट तरी राज्य सरकारकडून घ्या; गडकरींनी आमदार खासदारांना सुनावले
Next Article
advertisement
BMC Shiv Sena Shinde : निवडून येताच शिंदे गटाच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार?  महापौर निवडी आधीच बीएमसीमध्ये उलटफेर
निवडून येताच शिंदे गटाच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार? महापौर निवडी आधी
  • मुंबई महापौर निवडीचा तिढा सुरू असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला धक्का बसण्याच

  • शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक राजेश सोनावळे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

  • सोनावळे यांना अपात्र ठरवून पु्न्हा निवडणूक घेण्याची मागणी करणारी याचिका कोर्टात

View All
advertisement