Buldhana News : 'त्याची 'अख्ख्या गावात दहशत, लोक दार उघडायलाही घाबरतात, बुलढाण्यात नेमकं काय घडलं?
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
बुलढाण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.
बुलढाणा, राहुल खंडारे, प्रतिनिधी : शिकार आणि पाण्याच्या शोधात अनेकदा वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरण्याच्या घटना घडत असतात. अनेकदा वन्यप्राण्यांकडून मानवावर हल्ले देखील होतात. तर काही वेळेला रस्ते अपघातांमध्ये प्राण्यांचा मृत्यू होतो. बुलढाण्यातील वझर गावात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या गावाच्या चहुबाजूनं जंगल असल्यामुळे या ठिकाणी अनेकदा वन्यप्राण्यांचा गावात वावर आढळून येतो. यावेळेला तर चक्क गावात वाघ शिरल्याची घटना घडली आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. गावकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील वझर हे गाव उंच टेकडीवर वसलेलं आहे. या गावाला अभयारण्यानं वेढा घातलेला आहे. त्यामुळे नेहमीच जंगली प्राणी या गावात मुक्तसंचार करत असतात. आता तर चक्क वाघ या गावात शिरला आहे, या ठिकाणी वाघाचे ठसे देखील दिसून आले आहेत.
काही कर्मचारी एलबीएस बांधांचे मेजरमेंट करीता गेले असता त्यांना डोंगरावरती वाघाचे ठसे दिसून आले आहेत, एका सामाजिक संस्थेच्या अंतर्गत खामगाव तालुक्यात वॉटर कंजर्वेशन तसेच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त कामे चालू आहेत, त्यामध्ये वझर येथे मोठ्या प्रमाणात ई क्लास क्षेत्र आहे तेथे लाखो रुपयांचे कामे संस्थेच्या वतीने चालू आहेत. त्यातील एक टीम मेजरमेंट घेण्यासाठी गेली असता, कर्मचाऱ्यांना काही ठिकाणी वाघाच्या पंजाचे ठसे तसेच अस्वलांच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
Location :
Buldana,Buldana,Maharashtra
First Published :
July 03, 2024 1:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Buldhana News : 'त्याची 'अख्ख्या गावात दहशत, लोक दार उघडायलाही घाबरतात, बुलढाण्यात नेमकं काय घडलं?


