accident : खासगी बस चुकीच्या दिशेनं आली, दुचाकीला धडकली, 3 जणांचा जागीच मृत्यू

Last Updated:

मृत्यू झालेल्या पैकी एक मुंबई तर दोघे जळगाव येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

News18
News18
राहुल खंदारे, प्रतिनिधी
बुलडाणा, 15 नोव्हेंबर : बुलडाण्यामधून अपघाताची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. मुंबई नागपूर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावर वडनेर भोलजी नजिक लक्झरी आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला असून या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्गावर वडनेर भोलजी नजीक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. झालेल्या भीषण अपघातात दुचाकी वरील तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या पैकी एक मुंबई तर दोघे जळगाव येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
advertisement
महिंद्रा ट्रॅव्हल्सची बस ही चुकीच्या बाजूने येत होती. त्याचवेळी समोरून आलेल्या भरधाव दुचाकीला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यात दुचाकीचा चुराडा झाला.  या अपघातात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच नांदुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघातामुळे मुंबई नागपूर महामार्गावर वाहतूक खोळंबली होती. ती सुरळीत करत अपघातात मरण पावलेल्याचे मृतदेह ताब्यात घेतले आहे. मृतदेहांना शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.
advertisement
भरधाव कारने महिलेला उडवलं
दरम्यान, पनवेलमध्ये पादचारी महिलेला कार चालकाने धडक दिल्याची घटना घडली आहे. अर्चना माने असं जखमी महिलेचं नाव आहे. या महिलेला तातडीने MGM हॉस्पिटल कामोठे इथं दाखल केले आहे. कारचालक दिलीप उदय हा आपली कार चालवत मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून मुंबई बाजूकडे जात होता. त्याचवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या अर्चना माने या महिलेला रस्ता ओलांडत असताना जोराची धडक दिली. कारचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे ही घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. या अपघातामध्ये महिलेला गंभीर दुखापत झाली असून MGM हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं आहे. या प्रकरणाचा तपास खांदेश्वर पोलीस करत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
accident : खासगी बस चुकीच्या दिशेनं आली, दुचाकीला धडकली, 3 जणांचा जागीच मृत्यू
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement