Maharashtra Cabinet Meeting : शेतकऱ्यांच्या मदतीवरून कॅबिनेटमध्ये खडाजंगी, मंत्री आणि अधिकाऱ्यांमध्ये जुंपली
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Cabinet Meeting : आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे मंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.
मुंबई: राज्यात झालेल्या अतिवृष्टी, पूरग्रस्तांना जाहीर करण्यात आलेल्या मदतीवरून आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे मंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. वातावरण गरम होत असल्याचे लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली.
राज्यात पूरग्रस्त शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेल्या मदतीवरून सरकारमधीलच मंत्र्यांनी प्रशासनावर थेट आरोप केल्याने मोठा वाद निर्माण झाला. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी कॅबिनेट बैठकीत प्रशासनावर थेट निशाणा साधला.
मकरंद पाटील यांनी बैठकीत सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोचली नाही, असा थेट आरोप केला. मात्र, प्रशासनाने या आरोपांना फेटाळत सांगितले की, शासनाच्या निर्णयानुसार मदतीचे वितरण सुरू असून, बहुसंख्य शेतकऱ्यांपर्यंत निधी पोहोचला असल्याचा दावा केला.
advertisement
अधिकाऱ्यांच्या या दाव्यावर मकरंद पाटील यांनी उलट सवाल केला. त्यांनी म्हटले की, सरकार कडून देण्यात आलेली मदत तुम्ही म्हणता मदत पोचली, जिल्हाधिकारी म्हणतात मदत पोचली पण शेतकरी म्हणतात मदत मिळाली नाही असे म्हटले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली मध्यस्थी...
या परस्परविरोधी दाव्यांनंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली. तातडीने आढावा बैठक घेण्याचे आदेश त्यांनी दिले. आतापर्यंत किती शेतकऱ्यांना मदत मिळाली, किती रक्कम वितरित झाली आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये विलंब होत आहे, याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
advertisement
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय...
राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने शेतकऱ्यांना अतिरिक्त 11 हजार कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानुसार, ही रक्कम पुढील 15 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यापूर्वी 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत पोहोचली असून, आता पुढील टप्प्यातील निधी वाटप सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 28, 2025 2:37 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Cabinet Meeting : शेतकऱ्यांच्या मदतीवरून कॅबिनेटमध्ये खडाजंगी, मंत्री आणि अधिकाऱ्यांमध्ये जुंपली


