दुभाजकावर धडकली मग उलटली, नाशिकहून मुंबईला येणाऱ्या कारचा भीषण अपघात

Last Updated:

नाशिक-मुंबई महामार्गावरील आसनगाव रेल्वे पुलाजवळ कार अपघातात दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. पोलिस आणि नागरिकांनी मदत केली असून तपास सुरू आहे.

nashik accident bike news
nashik accident bike news
नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका कारचा शहापूरजवळ भीषण अपघात झाला. नाशिक-मुंबई महामार्गावरील आसनगाव रेल्वे पुलावर हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या अपघातात दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेल्या या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ती कार दुभाजकावर आदळली आणि नंतर उलटली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचे मोठे नुकसान झाले आहे. कारचे नियंत्रण नेमके कशामुळे सुटले, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
अपघातानंतर कारमधील दोन्ही प्रवासी आत अडकले होते. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्यांना बाहेर काढले. जखमींना त्वरित जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
advertisement
या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दुभाजकावर धडकली मग उलटली, नाशिकहून मुंबईला येणाऱ्या कारचा भीषण अपघात
Next Article
advertisement
OTT Movies: तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; हे आहेत बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
    View All
    advertisement