Beed News : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या सहकाऱ्यावर बीडमध्ये हल्ला, लाठ्या-काठ्यांनी मारहाण, माजलगावमध्ये तणाव

Last Updated:

Beed News : ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची कार जाळल्याच्या घटनेच्या काही तासानंतर बीड जिल्ह्यात आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या सहकाऱ्यावर बीडमध्ये हल्ला, माजलगावमध्ये तणाव...
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या सहकाऱ्यावर बीडमध्ये हल्ला, माजलगावमध्ये तणाव...
बीड: ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची कार जाळल्याच्या घटनेच्या काही तासानंतर बीड जिल्ह्यात आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ओबीसी आंदोलक नेते लक्ष्मण हाके यांचे सहकारी असलेल्या पवन करवर यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
advertisement
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे निकटवर्तीय आणि सहकारी कार्यकर्ते पवन करवर यांच्यावर मध्यरात्री हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील सावरगाव परिसरात असलेल्या एका हॉटेलसमोर हा हल्ला घडला. करवर सध्या जखमी अवस्थेत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
advertisement
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पवन करवर हे जालना येथे एका सभेसाठी जात असताना रात्री सुमारास सावरगावजवळ थांबले. तेथील एका हॉटेलमध्ये ते जेवणासाठी गेले होते. जेवण संपवून बाहेर पडत असताना, हॉटेलच्या आत विजयसिंह पंडित यांचा फोटो पाहून ते उठले आणि निघून जात होते. त्याचवेळी हॉटेलचे मालक प्रवीण जगताप आणि नितीन जगताप यांनी त्यांना अडवले आणि लाठ्या, काठ्या तसेच लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.
advertisement
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून करवर गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ल्याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
advertisement

वाघमारेंची कार जाळणारा अटकेत...

ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची कार जाळणाऱ्या आरोपीला बीड पोलिसांनी अटक केली. विश्वंभर तिरुखे असे आरोपीचे नाव असल्याची माहिती आहे. आरोपी हा मराठा आरक्षण आंदोलनात सक्रीय असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
advertisement
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed News : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या सहकाऱ्यावर बीडमध्ये हल्ला, लाठ्या-काठ्यांनी मारहाण, माजलगावमध्ये तणाव
Next Article
advertisement
OTT Movies: तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; हे आहेत बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
    View All
    advertisement