Navi Mumbai Fire: नवी मुंबईत भीषण अग्नीतांडव, मोठा गोंधळ
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
नवी मुंबईतील नेरूळमध्ये सेक्टर 20 मध्ये शुक्रवारी आग लागली होती. मतमोजणी केंद्रापासून अवघ्या काही मिनिटाच्या अंतरावर असलेल्या नेरूळ गावातील झोपडपट्टीमध्ये आगीची दुर्घटना घडली.
नवी मुंबईतल्या नेरूळमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. नवी मुंबईतील नेरूळमध्ये सेक्टर 20 मध्ये शुक्रवारी (16 जानेवारी) मतमोजणी सुरू असताना आग लागली होती. मतमोजणी केंद्रापासून अवघ्या काही मिनिटाच्या अंतरावर असलेल्या नेरूळ गावातील झोपडपट्टीमध्ये आगीची दुर्घटना घडली. त्यामुळे काही वेळासाठी परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. काही वेळासाठी मतमोजणी देखील बंद करण्यात आली होती. त्यामुळे परिसरातील मतमोजणी पूर्ण होण्यासाठी काहीसा उशीर देखील झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, झोपडपट्टीमध्ये चार ते पाच घरगुती गॅस सिलिंडरचा एकामागून एक स्फोट झाला, ज्यामुळे काही मिनिटांतच सहा ते सात झोपड्या संपूर्ण जळून खाक झाल्या. त्यामुळे परिसरामध्ये अख्खे धुराचे लोट पाहायला मिळत होते. ज्यामुळे परिसरातील रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. दरम्यान, सुदैवाने, आगीच्या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही, अशी माहिती तेथील अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितली.
advertisement
परिसरामध्ये खूपच दाटवस्ती असल्यामुळे झोपडपट्टीला आग झपाट्याने लागली. आग वेगाने पसरत असल्यामुळे तेथील रहिवाशांनी लगेचच तिथून पळ काढला. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. माहिती मिळताच अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अग्निशमन कार्य सुरू केले. सततच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली, ज्यामुळे ती तात्काळ रोखण्यात यश मिळाले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सविस्तर तपास सुरू आहे. अधिकाऱ्यांकडून बाधित कुटुंबांचे किती नुकसान झाले आहे याचाही आढावा घेत आहेत.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Navi Mumbai Panvel Raigarh,Raigad,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 10:17 PM IST









