चंद्रपूरकरांची उडाली झोप, आधी महापूर अन् आता भूकंपाचे तीव्र धक्के, घडतंय काय भीतीचं वातावरण
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
चंद्रपूरच्या वरोरा तालुक्यात 3.2 रिश्टर स्केलचा भूकंप, कोणतीही हानी नाही. मुसळधार पावसाचा इशारा, बंगालच्या उपसागरात डिप्रेशनची शक्यता, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.
हैदर शेख, प्रतिनिधी चंद्रपूर: राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असताना एक महत्त्वाची घटना समोर येत आहे. चंद्रपुरातील काही ठिकाणी मुसळधार पावसानं मोठं नुकसान झालं आहे. त्याचं टेन्शन असतानाच आता भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील मार्डा आणि एकोना परिसरात रात्री उशिरा 09 वाजून 21 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार 3.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद करण्यात आली आहे. सेसमिक स्टडी ऑफ इंडियाच्या भूकंप ॲपवर या भूकंपाची नोंद करण्यात आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाने कोणतीही हानी झालेली नाही. विशेष म्हणजे, या परिसरातील नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले नसल्याचेही माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही असं आवाहन केलं आहे.
advertisement

चंद्रपूरमध्ये आजपासून पुन्हा मुसळधार पाऊस चंद्रपुरात पडणार आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. पुढचे ५ दिवस महत्त्वाचे असून राज्यात अति मुसळधार पाऊस राहील. राज्यात मान्सूनच्या परतीचा प्रवास थांबला असून, २३ ते २९ सप्टेंबरदरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार होणारी नवीन कमी दाबाची प्रणाली ‘डिप्रेशन’मध्ये रूपांतरित होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही सायक्लोनिक सर्क्युलेशनचा धोका वाढला असून अति मुसळधार पाऊस होत आहे. त्याच वेळी भूकंपाचे धक्के बसल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
Location :
Chandrapur,Maharashtra
First Published :
September 25, 2025 8:20 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
चंद्रपूरकरांची उडाली झोप, आधी महापूर अन् आता भूकंपाचे तीव्र धक्के, घडतंय काय भीतीचं वातावरण